How To Remove Bad Smell From Bathroom Toilet: घरात फ्रेश वातावरण राहावं यासाठी अनेकदा शेकडो रुपये खर्च केले जातात पण आज आपण एक अशी सोपी हॅक पाहणार आहोत जी तुमच्या घरातील टॉयलेट व बाथरूममधील दुर्गंधी कमी करण्यात खूप मोठी मदत करू शकते. बाथरूम किंवा टॉयलेटमध्ये सदैव पाणी असल्याने तिथे काही प्रमाणात कुबट वास येतो आणि मग हीच दुर्गंधी घरभर पसरू लागते. यासाठी तुम्हाला महागडे रूम फ्रेशनर घ्यायची आता फारशी गरज लागणार नाही कारण एका बाटलीच्या झाकणात काही गोष्टी एकत्र करून तुम्ही या कुबट वासाचे प्रमाण कमी करू शकता, नेमकी काय आहे ही ट्रिक चला पाहूया.

इन्स्टाग्रामवर @masteringhacks या पेजवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओनुसार आपल्याला एक पेस्ट तयार करायची आहे.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
पाणी किंवा चहात फक्त १५ मिली ‘हे’ द्रव घातल्यास कंबरेचा घेर व वजन होईल कमी; नवीन अभ्यास काय सांगतो?
Summer heat
Health Special : उन्हाळ्याची झळ लागू लागली; काय काळजी घ्याल?
Bhandara Special Aloo Tamatar Rasa Bhaji Recipe
भंडाऱ्यातली बटाटा भाजी चवीला एकदम स्पेशल.. भंडारा स्पेशल भाजीची घ्या झणझणीत रेसिपी

सर्वात आधी आपण थोडा बेकिंग सोडा आणि डिटर्जंट पावडर एकत्र घ्या,
यामध्ये किंचित व्हिनेगर किंवा लिंबाचा रस ऍड करा.
नीट ढवळून पेस्ट तयार करा व एका प्लॅस्टिकच्या बॉटलच्या झाकणात काठोकाठ ही पेस्ट भरा,
मग तुम्हाला हलका प्लॅस्टिकचा थर यावर पसरवून त्याला लहान छिद्र करा. आता त्या झाकणाला एक बारीक दोरी बांधायची आहे.
हे झाकण तुम्ही तुमच्या कमोडच्या मागील फ्लश टॅंकमध्ये टाकून ठेवा,
जेव्हा जेव्हा तुम्ही फ्लश कराल तेव्हा पाण्यात या मिश्रणाचा अंश मिक्स होऊन टॉयलेटमध्ये तेच पाणी वापरले जाईल.

आता याचा फायदा काय तर जसे की तुम्हाला माहीतच असेल की, बेकिंग सोडा हा दुर्गंध शोषून घेण्याचे काम करतो तर व्हिनेगर व लिंबाच्या रसामुळे टॉयलेटमध्ये पडणारे हट्टी डाग कमी होतात. दुसरीकडे डिटर्जंटमुळे सुगंध पसरायला मदत होते.

Video: तुमचे टॉयलेट- बाथरूम करा फ्रेश, पाहा घरगुती उपाय

हा जुगाड तुम्ही दर आठवड्याला तुमच्या टॉयलेट बाथरूममध्ये करू शकता. जर फ्लश टॅंक नसेल तर या द्रावणात थोडं जास्त पाणी मिसळून आपण बाथरूम व टॉयलेट नियमित पद्धतीने घासून सुद्धा स्वच्छ करू शकता, यासाठी एकावेळी अनेक गोष्टी लागत असल्या तरी त्याचे प्रमाण अगदीच कमी आहे त्यामुळे अवघ्या २० रुपयात तुम्ही महिनाभर हा जुगाड वापरू शकता.