Video How Sabudana Is Made: साबुदाण्याची खिचडी, वडे, थालीपीठ, साबुदाण्याच्या पिठाचे साजूक तुपातले लाडू हे पदार्थ खाल्ल्याशिवाय उपास केल्यासारखे वाटतच नाही. हो ना? पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का की हा साबुदाणा नेमका बनतो तरी कसा? अर्थात साबुदाण्याचं झाड, पिकं असल्याचे काही आजवर ऐकलेले नाही. मग एखाद्या फळापासून जर हे साबुदाणे बनवले जात असतील तर त्यावर नेमकी काय प्रक्रिया केली जाते? सोशल मीडियावर या प्रश्नाचे उत्तर पाहायचे तर अनेकांच्या मते साबुदाणा लाकडापासून बनवला जातो, काही म्हणतात की तो प्लॅस्टिकने बनवला जातो. पण, आज आम्ही आपले सर्व गोंधळ दूर करणार आहोत, चला तर पाहूया साबुदाणा बनवण्याची सविस्तर पद्धत…

साबुदाणा कशापासून बनतो?

साबुदाणा सागो पाम नावाच्या झाडापासून बनवले जातात. दक्षिण भारतामध्ये सागो झाडे मोठ्या प्रमाणात आढळत असली तरी मूळ ही वनस्पती आफ्रिकेतून भारतात आणली गेली आहे या साबुदाणा वनस्पतीच्या खोडापासून बनवला जातो. सागोच्या झाडाच्या खोडाला ‘टॅपिओका रूट’ तसेच कसावा देखील म्हणतात आणि त्यापासून साबुदाणा बनवला जातो.

Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?

साबुदाणा बनवण्याची प्रक्रिया

प्रथम हा लगदा मोठ्या भांड्यांमध्ये बाहेर काढला जातो आणि बर्‍याच दिवस पाण्यात ठेवला जातो. यानंतर, त्यात सतत पाणी देखील ओतले जाते. ही प्रक्रिया ४-६ महिन्यांपर्यंत वारंवार केली जाते. तयार केलेला लगदा बाहेर काढून मशीनमध्ये ठेवला जातो. या लगद्याला वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागले जाते. मग ते ग्लूकोज आणि स्टार्चपासून बनवलेल्या पावडरने पॉलिश केले जाते आणि अशा प्रकारे पांढर्‍या मोत्यासारखा दिसणारा साबूदाणा बाजारात येण्यास तयार असतो.

Video: साबुदाणा कसा बनतो?

हे ही वाचा<< “दारू प्यायल्यावर Ex आठवते कारण…” तज्ज्ञ सांगतात, आपण नशेत सगळं विसरून का जातो

दरम्यान, काहींच्या मते, साबुदाणा बनवताना अनेक दिवस हे खोड पाण्याच्या संपर्कात येत असल्याने त्यात अळ्या पडण्याची शक्यता असते. पाणी खराब झाल्यास हा साबुदाणा आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. यामुळेच काही ठिकाणी साबुदाणा उपासासाठी खाऊ नये असेही सांगितले जाते.