Premium

पाण्याचा माठ कसा स्वच्छ करावा? आठवड्यात एकदा ‘हे’ उपाय करून जंतू व आजरांना करू रामराम

Lifestyle News: पाण्याचा माठ नीट स्वच्छ न केल्यास नुकसानही होऊ शकते. आजच्या लेखात आपण माठ स्वच्छ धुण्याचे काही उपाय पाहणार आहोत.

Video How To Clean Water pots clay Matki at Home To Get Rid Of Bacteria and Diseases Weekly Cleaning routine Jugadu Tips
पाण्याचा माठ कसा स्वच्छ करावा? (फोटो: इंस्टाग्राम)

How To Clean Water Pots: आज जून महिना उजाडला तरी अद्याप मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये उन्हाचा तडाखा काही कमी झालेला नाही. भ्रुणह्क्यत जणू काही दिवसागणिक तापमानाचा पारा दुप्पटीने वाढत असल्याचा भास होतोय. अशा वेळी अंगाची लाहीलाही थांबवण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. अनेक डॉक्टरही असा सल्ला देतात. खरंतर एखाद्या कडक तप्त दुपारी थंडगार पाणी प्यायल्याने पोट व मन दोन्ही शांत व्हायला मदत होऊ शकते पण तुम्ही हे पाणी कशाप्रकारे थंड केले आहे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे ठरते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेकदा फ्रीजमधील पाण्याने सर्दी, सायनस असे त्रास वाढण्याची शक्यता असते या तुलनेत मातीच्या माठातील पाणी हे शुद्ध व सोयीस्कर पर्याय ठरते. तुम्ही जर माठातील पाणी पित असाल तर एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायला हवी की जसे याचे फायदे आहेत तसेच (नीट स्वच्छता न केल्यास) यामुळे नुकसानही होऊ शकते. आजच्या लेखात आपण माठ स्वच्छ धुण्याचे काही उपाय पाहणार आहोत.

पाण्याचा माठ स्वच्छ कसा करावा?

  • माठ साध्या वाहत्या पाण्याने धुतला तरी हरकत नाही. किंवा गरम पाणी काही वेळ माठात घालून ठेवा.
  • लिंबाची साल गरम पाण्यात घालून या सालीने माठाचा आतील भाग स्वच्छ करू शकता.
  • नारळाच्या किशीने माठ आतून बाहेरून घासून धुवू शकता.
  • बेकिंग सोडा व पाण्याच्या मिश्रणाने माठ आतून स्वच्छ करू शकता.
  • शक्यतो भांड्यांचा साबण किंवा काथ्या मातीच्या भांड्यावर वापरणे टाळावे.
  • माठ धुवून झाल्यावर कडक उन्हात सुकवत ठेवा. जेणेकरून उन्हामुळे जंतू नष्ट होण्यास मदत होऊ शकते.

Video: माठ वेळोवेळी स्वच्छ न केल्यास काय होते?

हे ही वाचा<< १० ते २० रुपयात मिक्सरच्या भांड्यांच्या ब्लेडची धार तीक्ष्ण कशी करावी? ‘हा’ जुगाड पाहून म्हणाल, “पैसे वाचले”

वरील टिप्स वापरून आठवड्यातून निदान एकदा तरी माठ स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-06-2023 at 15:38 IST
Next Story
Cow Milk Vs Buffalo Milk: लहान मुलांसाठी कोणतं दूध असतं आरोग्यदायी? गाईचं की म्हशीचं? जाणून घ्या फरक