scorecardresearch

Video: फोटोमध्ये नेहमीच हात जाड दिसतो? ‘या’ सोप्या पोज व अँगल ट्राय करून पाहा

Poses For Self Portraits: बहुतांश जण फोटोमध्ये पोट, डबल चीन नीट लपवतात पण दंड कसे बारीक दिसतील असा प्रश्न असतोच. तुमचे हातही छान डौलदार दिसावेत व बांधा सुडौल वाटावा यासाठी काही सोप्या टिप्स..

Video How To Make Arms Hands Look Slim in Photos Poses For Plus Size Girls Easy Photo Poses For Portraits
Video: फोटोमध्ये नेहमीच हात जाड दिसतो? 'या' सोप्या पोज व अँगल ट्राय करून पाहा (फोटो: इंस्टाग्राम/Pexels)

How To Look Slim In Photos: स्वतःचे फोटो काढणं आवडत नाही असे क्वचितच काहीजण असतात, आणि या मंडळींना मग ग्रुपबरोबर बाहेर गेलं की इतरांचे फोटो काढायची जबाबदारी दिली जाते. त्यातही त्यांचा फार उत्साह नसल्याने आपल्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी त्यांना इच्छाच नसते. साधारणतः फोटो काढताना सगळ्यांकडून ऐकू येणारी एकच तक्रार म्हणजे यार मी जाड दिसतेय/ दिसतोय. ही तक्रार इतकी कॉमन आहे की त्यावरच उत्तरही ठरलेलं असतं, आहेस तर दिसणारच ना? पण मंडळी एक सिक्रेट सांगायचं तर कॅमेरा हा आपण आहोत त्यापेक्षा थोडं जास्तच दाखवतो त्यामुळे तुमचे फोटो मूळ शरीरापेक्षा जाड येत असतील तर तुमची नाही तर उलट कॅमेरा व कॅमेरामनची चूक असू शकते. आता चुकीचं खापर कोणावर फोडायचं हा विषय जाऊद्या पण आपण एक बेसिक अँगलचा बदल करून तुमचे फोटो उत्तम कसे येतील हे बघुयात.

सोशल मीडियावर अनेक इन्फ्ल्यूएंसर फोटो कसे काढावे याच्या टिप्स देत असतात. आज आपण असाच एक व्हिडीओ पाहणार आहोत. हा व्हिडीओ निवडण्याचे कारण म्हणजे बहुतांश जण फोटोमध्ये पोट, डबल चीन नीट लपवतात पण दंड कसे बारीक दिसतील असा प्रश्न असतोच. तुमचे हातही छान डौलदार दिसावेत व बांधा सुडौल वाटावा यासाठी काही सोप्या टिप्स या व्हिडिओमध्ये दिल्या आहेत.

फोटोमध्ये हात जाड दिसतोय? ‘या’ पोज करा ट्राय

हे ही वाचा<< तुमच्या वयानुसार दिवसाला किती कॅलरीज खायला हव्यात? परफेक्ट बॉडीसाठी पाहा सोपा तक्ता

काय मग मंडळी आवडला ना Video? तुम्हीही पुढच्या वेळी या बेसिक गोष्टी लक्षात ठेवूनच सेल्फी किंवा फोटो काढा. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे अनेकजण आपले फोटो जाड येतात यावरून नाराज होतात. पण वाईट वाटून घेण्यापेक्षा उत्तर शोधणं कधीही उत्तम, हो ना? तात्पुरत्या उत्तरासाठी या पोज तुम्ही ट्राय करून पाहू शकता, आणि जर तुम्हाला खरंच आपल्या बॉडीवर काम करायचं असेल तर व्यायाम व उत्तम आहार हा पर्याय जास्त कामी येईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 19:24 IST
ताज्या बातम्या