How to make Coconut Oil at home for cooking: भारतीय घरांमध्ये कितीही महागडी ऑलिव्ह ऑइल, बटर किंवा अन्य तेलं आणली तरी खोबरेल तेलाची जागाच कोणी घेऊ शकत नाही. अगदी जेवणापासून ते औषधांपर्यंत खोबरेल तेलाचा वापर होतो. त्वचेवर, केसाला सुद्धा खोबरेल तेल अत्यंत गुणकारी ठरते. पण अनेकदा बाजारात मिळणारं खोबरेल तेल हे भेसळयुक्त असू शकतं. अगदी आपण कितीही शक्कल लढवली तर १००% शुद्ध तेल तुम्हाला सापडणे कठीणच आहे. अशावेळी तुम्ही कधी घरीच खोबरेल तेल बनवायचा विचार केला आहे का? आपल्या सर्वांच्या घरात नारळ असतात अगदी कमीत कमी खर्चात व फार वेळ न लावता तुम्हीही घरी शुद्ध खोबरेल तेल बनवू शकता. आता ते कसं हे ही पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घरी खोबरेल तेल कसे बनवायचं? (How To Make Coconut Oil)

१) घरी नारळाचे तेल बनवण्यासाठी सगळ्यात आधी नारळ फोडून त्यातलं पाणी काढून घ्या.
२) नारळाचे सुरीने पातळ तुकडे करा.
३) हे तुकडे मिक्सरला लावून वाटून घ्या
४) तुम्हाला खोबऱ्याच्या चटणीसारखं खोबरं मिळेल. एका स्वच्छ कपड्याने नारळाचं दूध गाळून घ्या (सोलकढीला आपण जी पद्धत वापरतो तीच वापरायची आहे)
५) एक दोन वेळा असे करून मग ते नारळाचे दूध फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.
६) ७ ते ८ तासात हे मिश्रण सेट झाल्यावर गरम कढईत नीट उकळूवुन घ्या
७) एक उकळी फुटल्यावर या मिश्रणातून तेल पडण्याला सुरूवात होईल. तेल गाळणीने गाळून बरणीत काढून घ्या.
८) खोबऱ्याचं मिश्रण गोल्डन होईपर्यंत तळून घ्या आणि उरलेलं तेल गाळून घ्या.

हे ही वाचा<< दीड लिटर दुधाने बनवा अर्धा किलो तूप; पहा घरगुती सोपी रेसिपी

दरम्यान, हे तेल खूप दिवस टिकते तुम्ही जर जेवणात वापरणार असाल तर ते वेगळ्या भांड्यात ठेवा व त्वचा केसांसाठी वेगळे भांडे करा. यामुळे जेवणाचे, मसाल्याचे हात तेलाला फार लागणार नाहीत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video how to make virgin coconut oil at home with just one coconut check simple steps to save money kitchen tips svs
First published on: 18-03-2023 at 16:30 IST