How To Make Mixer Grinder Blades Sharp: अलीकडे गाव खेड्यांपासून ते शहरापर्यंत, गरीब- श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करता मिक्सर ग्राइंडर हा प्रत्येक घरातील अविभाज्य भाग बनलेला आहे. खूप वेळ आणि मेहनत वाचवणारी ही जादुई मशीन सर्व जेवण बनवणाऱ्यांची मैत्रीण ठरते. पण म्हटलं तसं ही एक 'मशीन' आहे. आणि मशीन म्हणजे कधी ना कधी खराब होण्याचा धोका हा आलाच. अगदी बिघाड झाला नाही तरी अनेकदा मिक्सरच्या भांड्यांचे ब्लेड झिजल्याने त्यांची धार कमी कमी होऊ शकते. अर्थात यामुळे वाटणाचा वेळ वाढतो आणि इतकी मेहनत घेऊनही काहीवेळा नीट रिझल्ट काही मिळत नाहीच. आज आपण इंस्टाग्रामच्या एका स्मार्ट गृहिणीकडून मिक्सरच्या भांड्यांचे ब्लेड तीक्ष्ण व टोकदार कसे करायचे हे जाणून घेणार आहोत. Video: मिक्सरच्या भांड्याचे ब्लेड धारदार करण्यासाठी उपाय 1) हार्डवेअर दुकानात तुम्हाला सहज एखादा सॅण्ड पेपर मिळेल. हा पेपरचा तुकडा मिक्सरच्या भांड्यांच्या पातीला घासून त्याची धार वाढवता येऊ शकते. 2) अॅल्युमिनियम फॉइलचा वापर करून तीक्ष्ण केले जाऊ शकतात. 3) मिक्सरच्या भांड्याला धार करण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे सगळ्यात आधी एका मिक्सरच्या भांड्यात काळं मीठ काढून घ्या आणे हे मिठाचे खडे मिक्सरमधून बारीक फिरवून घ्या. यामुळे मिक्सरचे ब्लेड्स धारदार होण्यास मदत होईल. @FoodieLalita या अकाउंटवर या सोप्या टिपचे प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखवलेले आहे, चला पाहूया… https://www.instagram.com/reel/CsVtoEltJlb/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA== हे ही वाचा<< मासिक पाळी अनियमित असताना गर्भधारणा होऊ शकते का? PCOS वर पूर्ण मात करण्यासाठी डॉक्टरांचा फंडा लक्षात घ्या कोणताही उपाय करण्यापूर्वी हॅण्ड ग्लोव्हज घालणे आवश्यक आहे.