scorecardresearch

Premium

रोपांची पानं सुकून पिवळी पडलीयेत? २०० मिली पाण्यात ‘हे’ दोन पदार्थ मिसळून आणा नव्याने बहर, पाहा Video

Garden Tips In Marathi: . आज आम्ही तुम्हाला गडबडीत झालेली चूक सुधारण्यासाठी एक सोपा जुगाड सांगणार आहोत. अवघ्या २०० मिली पाण्याचा हा जुगाड तुमच्या सुकून पडलेल्या रोपांना नव्याने बहर आणून देण्यास खूप मदत करू शकतो.

Video Jugaad Make Dried Leaves Green Again Tulsi Hibiscus Plants at Home Gardening 200 Ml Water Can Save Your Lots of Money
सुकून पडलेल्या रोपांना नव्याने बहर आणून देण्यासाठी जुगाड (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Dry Leaves Gardening Hacks In Marathi: घर कितीही लहान असलं तरी दारात- खिडक्यांमध्ये एखादं सुंदर रोप असावं अशी सर्वांचीच इच्छा असते. सकाळी उठताच दिसणारी हिरवळ मनाला सुखावून जाते. हौस कितीही असली तरी काही वेळा घाई गडबडीत या रोपांना पाणी देणं, त्यांना पुरेसं ऊन लागतंय का हे पाहणं, खत टाकून माती वर-खाली करणं हे सगळे सोपस्कार राहून जातात. आणि मग प्रेमाने वाढवलेली, सुखावणारी रोपं सुकायला सुरुवात होते. वेळेआधीच पाने पिवळी पडू लागतात काही वेळातर चक्क सुकून कुस्करली सुद्धा जातात. आज आम्ही तुम्हाला गडबडीत झालेली चूक सुधारण्यासाठी एक सोपा जुगाड सांगणार आहोत. अवघ्या २०० मिली पाण्याचा हा जुगाड तुमच्या सुकून पडलेल्या रोपांना नव्याने बहर आणून देण्यास खूप मदत करू शकतो.

@gardening99 या इन्स्टाग्राम पेजवर रोपांना हिरवेगार करण्यासाठीची टीप शेअर करण्यात आली आहे. यासाठी तुम्हाला पाणी, साखर, पांढरं व्हिनेगर व एक स्प्रे बॉटल इतकंच गरजेचं आहे. तुम्हाला सर्वात आधी पाण्यात अर्धं झाकण पांढरं व्हिनेगर मिसळायचं आहे आणि मग त्यात दोन चमचे साखर घालून नीट ढवळून घ्यायचं आहे. काही वेळ ठेवून मग हे द्रावण तुम्हाला स्प्रे बॉटलमध्ये भरायचे आहे. हे पाणी तुम्हाला रोपाच्या मुळाशी व पानांवर स्प्रे करायचे आहे. व्हिनेगरमुळे रोपाच्या मुळांची माती जंतुरहित होते तसेच साखरेमुळे पानांचा रंग टिकून राहण्यास मदत होते.

how to plant durva a t home gardening tips
Garden tips : गणपती बाप्पाला आवडणाऱ्या दुर्वा घरी कशा उगवायच्या? पाहा ही सोपी हॅक
Perfect Time To Eat Dinner
रात्री १०- ११ वाजता झोपत असाल तर जेवणाची योग्य वेळ कोणती? आहारतज्ज्ञांनी सोडवलं कोडं, जाणून घ्या पचनाचा फंडा
four couple yoga pose to stay fit together
Couple yoga poses : नाते आणि आरोग्य दोन्ही राहील उत्तम! तंदुरुस्त रहाण्यासाठी हे ४ प्रकार पाहा
marathon, medical tests, running, precautions, Health, marathi news,
Health Special: मॅरेथॉन धावताय? तर या टेस्ट केल्या आहेत का? (भाग १)

हे ही वाचा<<तुळशीचं रोप पाणी देऊनही सुकतंय? मातीत रोप लावताना ३० टक्के ‘ही’ गोष्ट मिसळा, लहान कुंडीतही येईल बहर

दरम्यान, हा प्रयोग तुम्हाला निदान २० दिवस तरी करणे आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला प्रभाव दिसून येऊ लागेल. तसेच तुम्ही रोपं कुंडीत लावल्यानंतर निदान एखाद्या दिवसाच्या अंतराने तरी अशा प्रकारे पाणी स्प्रे करायला हवे ज्यामुळे पाने सुकण्याची प्रक्रियाच पुढे ढकलली जाईल. तुम्हाला हा उपाय कसा वाटला आणि त्याचा प्रभाव कसा वाटतोय हे कमेंट करून नक्की कळवा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Video jugaad make dried leaves green again tulsi hibiscus plants at home gardening 200 ml water can save your lots of money svs

First published on: 28-11-2023 at 16:16 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×