scorecardresearch

Premium

१ वाटी बेसन, दह्यासह ‘हा’ पदार्थ वापरून तांब्याची भांडी करा लख्ख; दिवा, ताम्हण घासायचे कष्टच नाही, Video पाहा

Brass Copper Puja Vastu Cleaning Tips: आज आपण अशा काही सोप्या टिप्स पाहणार आहोत ज्याने आपण फार घासाघीस न करता तुमच्याकडील तांब्या पितळेची भांडी लख्ख चमचमती करू शकता

Video Jugaad To Clean Diya Tamhan Brass Copper With besan Kokum Dahi Tambyachi Bhandi Cleaning Tips Save Money
Video: तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी स्मार्ट टिप्स (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Brass Copper Puja Vastu Cleaning Tips Video: गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या एका आठवड्यावर आले आहे. तुमच्या घरीही बाप्पा येणार असतील तर तुम्हीही तयारी सुरु केली असेलच. पूजेची भांडी म्हणजेच दिवे, समई, ताम्हण इत्यादी वस्तू आता कपाटातून बाहेर काढायची वेळ आली आहे. आपण एकदा वापरल्यानंतर पुन्हा ही भांडी स्टोअर करून ठेवताना नक्कीच धुवून ठेवतो पण हवेतील काही घटकांमुळे या वस्तू काळवंडतात. अशावेळी तुम्ही जेव्हा पुन्हा भांडी वापरासाठी बाहेर काढता तेव्हा ती घासण्याला पर्याय नसतो. पण आज आपण अशा काही सोप्या टिप्स पाहणार आहोत ज्याने आपण फार घासाघीस न करता तुमच्याकडील तांब्या पितळेची भांडी लख्ख चमचमती करू शकता. फार वेळ न घालवता चला तर आपल्या आजच्या टिप्सकडे वळूया ..

तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी काय गोष्टी लागतात?

3 चमचे बेसन
1 चमचा मीठ
3 चमचे दही
1 चमचा हळद .
2 चमचे लिंबाचा रस

Video Rice Papad Marathi Recipe In Cooker Becomes Four Times After Frying Khichiya Papad Dough Making Papad Khar At Home
कुकरच्या एका शिट्टीत बनवा तांदळाच्या पिठाचे चौपट फुलणारे पापड, लाटायची गरजच नाही, बघा सोपा Video
Would you like to try egg roti or chapati for breakfast Note The Easy Recipe and try ones at home
नाश्त्यासाठी झटपट काय बनवायचं असा प्रश्न पडतोय? फक्त चार पोळ्या अन् अंडी वापरून बनवा ‘ही’ सोपी रेसिपी
kitchen tips how to clean clay vessel
Kitchen tips : मातीची भांडी वापरल्यावर कशी धुवावी? काय करावे, काय नको पाहा
how to get rid of fish odor tips
Kitchen tips : स्वयंपाक घरातील मच्छीचा वास कसा घालवावा? पाहा या ४ सोप्या टिप्स

पेस्ट होईपर्यंत सर्व साहित्य चांगले मिसळा.

कृती:

थोड्या प्रमाणात पेस्ट घ्या आणि तुम्हाला स्वच्छ करायच्या असलेल्या तांब्याच्या उत्पादनांवर घासून घ्या.. तांब्याच्या वस्तू पेस्टने हळूवारपणे घासण्यासाठी मऊ कापड किंवा सौम्य ब्रश वापरा. डाग हळूहळू नरमतील. कोणतेही क्लिनिंग एजंट वापरताना सावधगिरी म्हणून तांब्याच्या वस्तूच्या संपूर्ण पृष्ठभागावर लावण्यापूर्वी थोड्या भागावर लावून बघा आणि मग पूर्ण भांड्यावर लावा. अगदी गरज लागल्यास टूथब्रशने भांडं घासून स्वच्छ करा आणि मग मऊ कपड्याने पुसून काढा व मग पाण्याखाली धुवून घ्या. सूर्यप्रकाशात भांडी वाळवणे उत्तमच.

हे ही वाचा<< ऑफिसमध्ये बॉस व घरी काम, सतत वाढतोय रक्तदाब? तुमच्या चिडचिडीमागे ‘हा’ आजार तर नाहीये ना कारण, वाचा

दरम्यान, याशिवाय आपण आम्लयुक्त गोष्टी जसे की, लिंबू, कोकम, टोमॅटो यासारखे पदार्थ भांड्यावर घासून सुद्धा डाग काढू शकता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Video jugaad to clean diya tamhan brass copper with besan kokum dahi tambyachi bhandi cleaning tips save money svs

First published on: 11-09-2023 at 14:17 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×