scorecardresearch

Premium

हाताच्या नसा फुगल्याने हात अचानक सुन्न होतो? ‘नर्व्ह फ्लॉसिंग’ घरीच देऊ शकते आराम, कसे कराल?

Hand Swelling & Numbness: जास्तवेळ कीबोर्ड वापरणे किंवा जास्त लिहिणे, व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता, मधुमेह, आघात यामुळे मज्जातंतूंना इजा होऊ शकते

Video Swollen Veins In Hand Cause Swelling Pain In Nerves Therapist Suggest Nerve Flossing Technique Check How To Do
नसा फुगल्याने हात अचानक सुन्न झाल्यास काय करावे? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Why Hand Nerves Get Swelling Pain: अनेकदा एखादे काम करा असताना अचानक हाताच्या तळव्याचा मध्यभाग दुखू लागतो आणि हळूहळू पूर्ण हातच सुन्न होऊ शकतो. बोलीभाषेत आपण या सुन्न होण्याला हाताला मुंग्या येणे असंही म्हणतो. अशावेळी काहीजण जोरजोराने हात झटकला ही बरं वाटेल असं समजतात पण मुळात यामुळे हाताच्या वेदना वाढू शकतात. अशावेळी नेमकं काय करावं याविषयी आज आपण फिजिकल थेरपिस्ट क्रिस्टी बार्कर यांच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. क्रिस्टी यांनी हात अचानक सुन्न होण्यावर व नसांच्या दुखण्यावर ‘नर्व्ह फ्लॉसिंग’ हा उपाय सुचवला आहे. तुमच्या हाताच्या कोणत्या भागात वेदना होत आहेत यानुसार तुम्ही तीन पद्धतीने ‘नर्व्ह फ्लॉसिंग’ करू शकता.

हाताला सुन्नपणा का येतो? (Why Hand Gets Numb)

डॉ. अंकित बत्रा, ऑर्थोपेडिक सर्जन, शारदा हॉस्पिटल यांनी सांगितले की, सर्व मज्जातंतूंमध्ये विविध पॉइंट्स असतात जेथे कम्प्रेशन सामान्य असते. हे मज्जातंतू हाडांच्या आणि मऊ ऊतकांच्या संरचनेने वेढलेले असतात. जास्तवेळ कीबोर्ड वापरणे किंवा जास्त लिहिणे, व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता, मधुमेह, आघात यामुळे मज्जातंतू इजा होऊ शकते. तसेच मज्जातंतू जास्त ताणले गेल्यास हात सुन्न होऊ शकतो. नावर उपाय म्हणून सुचवलेला नर्व्ह फ्लॉसिंग हा मज्जातंतूंची गतिशीलता सुधारण्याचा एक मार्ग आहे. आपल्या स्नायूंप्रमाणेच आपल्या नसांची हालचाल करण्यासाठी हा प्रकार कामी येऊ शकतो.

couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…

नर्व्ह फ्लॉसिंगच्या तीन पद्धती: (How To Do Nerve Flossing)

  • मध्यवर्ती मज्जातंतू – हाताच्या मध्य भागात वेदना होत असल्याने आपले हात एक बाजूकडून दुसरीकडे फिरवा.
  • उल्नार मज्जातंतू – तुमचा अंगठा अनामिका वर ठेवा आणि तुमचा हात तुमच्या मानेच्या दिशेने दुमडून घ्या.
  • रेडियल मज्जातंतू – हाताची मुठ बनवा आणि आपला हात मागे घ्या मग पुन्हा पुढे करा.

दरम्यान नसा जास्त ताणून ठेवू नका या तिन्ही पद्धती अलगद करणे आवश्यक आहे अन्यथा वेदना वाढू शकतात.

हे ही वाचा<< मासिक पाळीत अतिरक्तस्त्रावाने अंडरवेअर, कपडे होतात खराब? पॅड्स वापरण्याची ‘ही’ पद्धत वाचवू शकते पैसे

नर्व्ह फ्लॉसिंग काम करते का? (Does Nerve Flossing Works)

शालोम अब्राहम, लीड फिजिओथेरपिस्ट, मणिपाल हॉस्पिटल, बंगळुरू यांनी सांगितले की, “नर्व्ह फ्लॉसिंगला नर्व्ह ग्लाइड किंवा नर्व्ह स्ट्रेचिंग असेही म्हणतात. हा एक प्रकारचा व्यायाम आहे जो संकुचित मज्जातंतूंना एकत्रित करण्यासाठी काम करतो. अगदी सोप्या भाषेत यातून तुमच्या मज्जातंतूची हालचाल होऊन त्यांच्यातील ताण कमी होऊ शकतो. मात्र लक्षात घ्या, यामुळे अनेकदा चुकीच्या पद्धतीने मज्जातंतू ताणले जाऊन वेदना वाढण्याचा धोका असतो. बहुतांश सर्जन असे प्रयोग तज्ज्ञांच्या देखरेखीशिवाय करण्याचा सल्ला देत नाहीत.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-06-2023 at 12:21 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×