scorecardresearch

Premium

२ मिनिटात नऊवारी नेसून गौरी- गणपतीत मिरवा; पायभर साडी नेसण्याचा जुगाड मिस करू नका, पाहा Video

Nauvari Saree Draping Marathi Video नऊवारीच काय अगदी दहा वारी जरी घेतली तरी काहीवेळा नेसताना जरा वर खाली झालं की साडी तोकडी पडू लागते आणि पण पायाच्या मागून वर जाऊन पोटऱ्यांपर्यंत येते. अशावेळी..

Video Two Minutes Nauvari Saree Draping In Marathi Saree Designs Peshwai Saree Wearing Tips Cover Legs With Jugaad
Video: गौरी गणपतीत अशी नऊवारी नेसून दिसा सुंदर (फोटो: इंस्टाग्राम/@karishma_dheerej)

How To Wear Nauvari Saree Marathi Video: गणपती बाप्पाचं आगमन आता काहीच दिवसांवर येऊन ठेपलं आहे. बाप्पांच्या पाठोपाठ २२ सप्टेंबरला गौराई सुद्धा माहेरपणाला येतील. आपल्यापैकी अनेकांची गणपतीसाठीची व स्वतःसाठीची खरेदी आतापर्यंत झालीच असेल, हो ना? साड्या, मॅचिंग ब्लाउज, छान- छान दाग- दागिने घालून नटण्यासाठी हा हक्काचाच सण आहे. यंदाच्या गणपतीत जर तुम्ही सगळ्या बहिणी किंवा नणंद- भावजया, सासू-सुना नऊवारी नेसण्याच्या विचारात असाल तर आजचा व्हिडीओ तुमच्यासाठी खास आहे. तसंतर अलीकडे सगळ्या मैत्रिणी रेडी टू वेअर नऊवारी शिवून घेतात, पण गणपतीच्या घाईत वेळेत साडी शिवून मिळेलच असा काही भरवसा देता येत नाही. शिवाय अगोदरच महागडी साडी घ्या आणि मग परत शिवायला हजार रुपये टाका, इतका खर्च करण्यापेक्षा ही झटपट २ मिनिटात नेसून होणारी नऊवारी काय वाईट आहे? चला बघूया..

इंस्टाग्रामवर @karishma_dheerej अशा मैत्रिणीने ही नऊवार साडीची ट्रिक शेअर केली आहे. अगदी धोती पॅन्ट सारखी नेसायला व वावरायला सहज अशी ड्रेपिंग पद्धत यात वापरली आहे. विशेष म्हणजे काहीवेळा बाजारात शिवून मिळणारी साडी ही पॅन्ट घातल्यासारखीच दिसते तसा काही प्रश्न या साडीच्या बाबत येणार नाही. पुढून छान एक कोचा (पेशवाई साडीसारखा खोचलेला भाग) येईल अशी ही ड्रेपिंग पद्धत आहे.

Shukra Gochar 2023
नोव्हेंबरपासून ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा? शुक्रदेव गोचर करताच माता लक्ष्मीच्या कृपेने होऊ शकता लखपती
9 year old Girl Feels Shooting Pain In Armpits Her Lips Turned Purple Mother Finds Out Real Reason Will Make Your Mind Blown
९ वर्षाच्या लेकीच्या काखेत दुपारी दुखू लागलं, रात्री ओठ जांभळे पडले मग.. आईने सांगितलेली कहाणी वाचून व्हाल सुन्न
wonderful Ganesh Decoration on Mushk theme of Bappa House by Vedant Walkar and k mrunmayee Video Viral snk 94
मोदक बनवण्यापासून सजावटीपर्यंत, लाडक्या बाप्पाच्या घरात सुरू आहे उंदीर मामांची लगबग, Viral Video एकदा पाहाच
Mumbai Local Video System To Pick Up Trash Garbage Thrown by Passengers From Train You Will Think Twice While Travelling
मुंबई लोकलच्या मार्गावर नवी सिस्टीम; ट्रेनमधुन कचरा टाकताना पुढच्या वेळी दोनदा विचार कराल, Video पाहा

आता सगळ्यात मुख्य टीप म्हणजे साडी नऊवारीच काय अगदी दहा वारी जरी घेतली तरी काहीवेळा नेसताना जरा वर खाली झालं की साडी तोकडी पडू लागते आणि पण पायाच्या मागून वर जाऊन पोटऱ्यांपर्यंत येते. यामुळे साडीचा लुक खराब होतो शिवाय चालताना सुद्धा अडचण येते. अशावेळी तुम्ही तीन गोष्टी करू शकता

१) तुम्ही चक्क साडी जेव्हा पायाखालून फिरवून घ्याल तेव्हा तिला घोट्याजवळ पिन लावून सिक्युअर करू शकता.
२) पिन सुद्धा निघेल असे वाटत असेल तर डबल साईडेड टेप सुद्धा उत्तम पर्याय आहे.
३) जर तुम्ही गणपतीच्या आधी एकदा प्रत्यक्ष साडी नेसून पाहण्याचा प्रयत्न करत असाल तर तेव्हा तुम्ही धावती शिलाई मारून घेऊ शकता.

२ मिनिटात नऊवारी साडी कशी नेसावी? (How To Drape Nauvari Saree In Two Minutes)

हे ही वाचा<< VIDEO: गणपतीला वापरलेल्या फुलांपासून ५ मिनिटांत बनवा घरीच धुप; घर राहील फ्रेश, कायम सुगंधित

तुम्हाला या सोप्या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि हो तुम्हा वाचकांना गणेशोत्सवाच्या आजपासूनच खूप खूप शुभेच्छा!

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Video two minutes nauvari saree draping in marathi saree designs peshwai saree wearing tips cover legs with jugaad svs

First published on: 13-09-2023 at 13:03 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×