Vidur Niti : ‘या’ तीन प्रकारच्या लोकांना चुकूनही पैसे उधार देऊ नका, जाणून घ्या काय म्हणते विदुर नीती ?

महर्षी विदुर हे त्यांच्या विदुर नीतिसाठी ओळखले जातात. विदुरजींनी पैशाबाबत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. पैशाच्या बाबतीत महात्मा विदुर मानतात की तीन प्रकारच्या लोकांना कधीही पैसे उधार देऊ नयेत, कारण अशा लोकांना दिलेले पैसे कधीही परत येत नाही किंवा ते नष्ट होतात.

vidur-niti

महर्षी विदुर हे त्यांच्या विदुर नीतीसाठी ओळखले जातात. त्यांच्या कुशाग्र बुद्धीने सर्वजण प्रभावित झाले. महाभारत काळातील प्रसिद्ध महात्मा विदुर यांची धोरणं आजच्या काळातही समर्पक मानली जातात. महाभारत युद्धापूर्वी महात्मा विदुर आणि धृतराष्ट्र यांच्यात जे काही घडले त्याला ‘विदुर नीती’ असं म्हटलं जातं. विदुरजींनी पैशाबाबत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. पैशाच्या बाबतीत महात्मा विदुर मानतात की तीन प्रकारच्या लोकांना कधीही पैसे उधार देऊ नयेत, कारण अशा लोकांना दिलेले पैसे कधीही परत येत नाही किंवा ते नष्ट होतात.

आळशी व्यक्ती : महात्मा विदुर यांच्या मते आळशी व्यक्तीला कधीही पैसे उधार देऊ नये. कारण आळशी लोकांना पैशाचं महत्त्व कधीच कळत नाही किंवा ते जमवता येत नाही. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते इतरांवर अवलंबून असतात. जर तुम्ही आळशी लोकांना पैसे उधार दिले तर ते परत मिळणे शक्य नाही.

आणखी वाचा : Chandra Grahan 2021: काही दिवसांनी होणार आहे चंद्रग्रहण, या ४ राशीच्या लोकांनी सावधानता बाळगावी

अनैतिक काम करणारे व्यक्ती : जे अनैतिक म्हणजे चुकीचं काम करतात, त्यांना कधीही पैसे उधार देऊ नये. कारण असे लोक तुमचा दिलेला पैसा चुकीची कामे करण्यासाठी वापरतात. असे लोक आपला स्वार्थ पूर्ण करण्यासाठी काहीही करायला तयार असतात. त्यामुळे वाईट कृत्य करणाऱ्या व्यक्तीला विसरूनही पैसे देऊ नयेत, कारण असे लोक तुमचा पैसा वाया घालवतात. तसेच तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो.

तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवत नाही असे लोक: ज्यांच्यावर तुमचा विश्वास नाही अशा लोकांना कधीही पैसे उधार देऊ नका. कारण अशा लोकांना तुम्ही पैसे उधार दिले तरी ते तुम्हाला परत मिळण्याची शक्यता नाही. म्हणूनच विदुरजी मानतात की, अशा लोकांना पैसे देऊन माणूस स्वतःचं नुकसान करतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Vidur niti never lend money to these 3 types of people vidur niti life management tips prp

Next Story
एचआयव्ही परिक्षणाने भारतात वाचतील लाखो प्राण
ताज्या बातम्या