Vidur Niti: अशा लोकांसोबत कोणतीही गोष्ट विचार करून शेअर करा, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता

महाभारत काळातील विदुरांच्या विचारांवर आधारित ‘विदुर नीति’ आहे. जीवनात असे काही लोक असतात ज्यांना चुकूनही आपली कोणतीच रहस्य सांगू नये. कारण असे लोक तुम्हाला भविष्यात त्रास देऊ शकतात. जाणून घेऊयात सविस्तर…

vidur-niti (1)

महाभारत काळातील विदुरांच्या विचारांवर आधारित ‘विदुर नीति’ आहे. महात्मा विदुरांमध्ये हीच खास गोष्ट होती की, त्यांच्यामध्ये एवढी बुद्धी असूनही त्यांनी कधीही स्वतःचा किंवा आपल्या समजाचा अभिमान बाळगला नाही. विदुरजींना नेहमीच खूप बुद्धिमान मानलं जायचं, त्यामुळे त्यांचे भाऊ धृतराष्ट्र यांना त्यांच्याशी प्रत्येक विषयावर बोलणं आवडत असे.

विदूर नीतिमधील धोरणाच्या काही भागांमध्ये विदुर आणि धृतराष्ट्र यांच्यातील संवाद समाविष्ट केले आहेत. कौरवांच्या विरोधात जाऊनही धृतराष्ट्र अनेक बाबतीत विदुरजींचे मत घेत असत, असं म्हणतात. विदुरजींच्या सहवासामुळे महाभारतात पांडवांचा विजय झाला, असं म्हणतात. विदुरजींच्या या धोरणांबद्दल असं म्हटलं जातं की, जीवनात असे काही लोक असतात ज्यांना चुकूनही आपली कोणतीच रहस्य सांगू नये. कारण असे लोक तुम्हाला भविष्यात त्रास देऊ शकतात.

चतुर व्यक्ती : विदुर नीतिनुसार जो माणूस हुशार असतो तो सर्व रहस्ये सांगण्याच्या लायक नसतो. कारण अशा लोकांना कोणाच्याही भावनांची पर्वा नसते. असे लोक कोणाच्या तरी भावना आणि विचार ऐकतात. मग वेळ आल्यावर त्यांचा स्वतःच्या हितासाठी वापर करण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच असं म्हणतात की माणसाला आयुष्यात महत्त्व द्यायचं असेल तर काही काळ थांबून विचार करणं आवश्यक आहे.

आणखी वाचा : Shukra Rashi Parivartan 2021: शुक्र राशी परिवर्तन ‘या’ राशीच्या लोकांसाठी ठरेल शुभ, उत्पन्नात वाढ होऊ शकते

लोभी व्यक्ती: विदुरजींच्या मते, लोभी व्यक्ती कोणाच्याही जवळचा होऊ शकत नाही. लोभी माणूस आपल्या वडिलांची फसवणूक देखील मानत नाही. अशा लोकांशी कोणतेही संबंध ठेवू नका आणि आपले रहस्य कधीही सांगू नका. कारण अशी व्यक्ती वेळ आल्यावर त्यांची हाव पूर्ण करण्यासाठी तुमच्या रहस्याचा वापर करू शकते.

आणखी वाचा : Vivah Muhurat 2022: 2022 मध्ये लग्नासाठी ‘हे’ आहेत सर्वात शुभ मुहूर्त, जाणून घ्या लग्नासाठी कोणते दिवस उत्तम आहेत ?

जास्त बोलणारे: जे लोक खूप बोलतात किंवा बोलण्याची आवड असते ते इतरांसाठी धोक्याचे ठरू शकतात. विदुर नीतिनुसार, ज्या लोकांना जास्त बोलण्याची किंवा गप्पा गोष्टी करण्याची सवय असते, ते स्वतःबद्दल कमी आणि इतरांबद्दल जास्त बोलतात. या काळात, बहुतेक लोक इतरांचे रहस्य लोकांना सांगण्यास मागेपुढे पाहत नाहीत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Vidur niti on believe do not tell your secrets to these people otherwise you may get into trouble prp

ताज्या बातम्या