Vidur Niti: चाणक्य नीतिप्रमाणेच विदुर नीति सुद्धा आजच्या काळात सर्वांसाठी मदतीची ठरते. जीवनातील अनेक संकटांपासून वाचवण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी विदुर नीतिने आपलं विशेष स्थान निर्माण केलंय. महात्मा विदूर यांनी मानवी समाजाच्या कल्याणाशी संबंधित अनेक नीति सांगितल्या आहेत. त्यापैकी एकामध्ये अशा कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्यामुळे व्यक्तीला भाग्यवान समजलं जातं. अशा व्यक्तीच्या आयुष्यात कधीही आनंदाची कमतरता नसते. जाणून घ्या नक्की काय आहेत त्या पाच गोष्टी…

गोड बोलणारी व्यक्ती: विदुर नीतीनुसार, जे स्त्री आणि पुरुष नेहमी गोड बोलतात. त्यांच्यावर आई सरस्वती आणि आई लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमीच राहतो. शास्त्रानुसार, वाणीमध्ये आई सरस्वतीचा वास्तव्य असतो. असं म्हणतात की वाईट आणि कडू बोलणाऱ्याचा स्वभाव देखील त्यांच्याच प्रमाणे वाईट होतो. विदुरजी प्रमाणे गोड बोलणाऱ्या माणसाचे नशीब त्याचे साथ देतात.

Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

आज्ञाधारक व्यक्ती: विदुर यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक पालकांची इच्छा असते की त्यांचे मुलं आज्ञाकारी असावे. जे त्यांच्या कुळाचे नाव चमकवतील. विदुर म्हणतात की जर मुलं आज्ञाधारक नसतील तर ते संपूर्ण कुळाचा नायनाट करतात आणि ज्यांचे मुलं आज्ञाधारक असतात ते नेहमी सुखी आणि नशीबवान असतात.

रोगमुक्त शरीर: विदुर म्हणतात की रोगांमुळे शरीर कमकुवत होतो. आजारी व्यक्तीची मानसिक आणि शारीरिक क्षमता क्षीण होऊ लागते.तो काहीही काम चांगलं करू शकत नाही. वारंवार आजारी पडल्यामुळे तो पैशे देखील साचवू शकत नाही. व्यक्ती निरोगी असेल तर तो नशीबवान समजला जातो.

ज्ञानी व्यक्तींची सर्वात मोठी संपत्ती : विदुर म्हणतात की माणसाजवळ ज्ञान ही एकमेव संपत्ती अशी आहे ज्याला कोणी चोरू शकत नाही. शास्त्रानुसार ज्ञान हे माणसाची सर्वात मोठी शक्ती आहे. विदुरजी म्हणतात की ज्ञान कठीण काळात माणसाची साथ निभावतो. वर्तमान काळात ज्ञान हेच उत्पन्नाचे मोठे साधन आहे.

चांगल्या आचरणाची स्त्री : विदुर म्हणतात की एका यशस्वी माणसाच्या मागे नेहमी एका बाईचा हात असतो. असं म्हणतात की एक स्त्रीच आपल्या घराला स्वर्ग किंवा नरका मध्ये बदलू शकते. विदुर म्हणतात की ज्या माणसाची स्त्री चांगल्या स्वभाव आणि चांगल्या आचरणाची आहे तो माणूस खरोखरच नशीबवान असतो.