प्रत्येक महिन्यात शुक्ल आणि कृष्ण पक्ष पंधरवड्यातील चतुर्थीला गणेशाची पूजा आराधना केली जाते. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी संबोधलं जातं. शुक्ल पक्षावर पडणार्‍या चतुर्थीला ‘विनायक चतुर्थी’ आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला ‘संकष्टी चतुर्थी’ म्हणतात. जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते, तेव्हा तिला ‘अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखले जाते. यावेळी मार्गशीष महिन्यातील शुक्ल पक्षात अंगारक विनायक चतुर्थी ७ डिसेंबर २०२१ मंगळवारी येत आहे. वर्ष २०२१ मधील ही शेवटची विनायक चतुर्थी आहे. गणपतीची विघ्नहर्ता म्हणूनही पूजा केली जाते. हिंदू मान्यतेनुसार, या दिवशी गणेशाची पूजा केल्याने सर्व समस्या दूर होतात. गणपतीची आशीर्वाद लाभावा म्हणून भक्त या दिवशी मोठ्या भक्तिभावाने आराधना करतात.

विनायक चतुर्थीचा शुभ मुहूर्त
मार्गशीष महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थी तिथीचा आरंभ ७ डिसेंबर २०२१ रोजी मंगळवारी रात्री २ वाजून ३१ मिनिटांनी होईल. तसेच तिथी समाप्ती ७ डिसेंबर २०२१ रोजी मंगळवारी रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी असेल.

विनायक चतुर्थीला या मंत्रांचा जप करा

  • “ओम एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दन्ति प्रचोदयात्”
  • “गजाननम् भूत गणादि सेवितम्, कपित् य जम्भु फलसरा ​​भिक्षितम्, उमसुतम् शोका विनशा करणम्, नमामि विघ्नहेश्वर पद पंकजम्”
  • “वक्रतुण्ड महाकाय, सूर्य कोटि समप्रभ:, निर्विघ्नम् कुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा”

विनायक चतुर्थीचा पूजाविधी

  • पूजास्थळाची साफसफाई आणि गंगाजल शिंपडा
  • भगवान गणपतीला वस्त्र घालून दीप प्रज्वलित करा
  • गणपतीला सिंदूर तिलक लावा आणि पुष्पार्पण करा
  • गणपतीला दुर्वा प्रिय असून २१ दुर्वांची जुडी अर्पण करा
  • गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवा
  • पूजा पूर्ण झाल्यावर आरती करा आणि झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागा