Banana Storage Hack Video: सोशल मीडियावर कायमच अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल प्लॅटफॉर्म म्हणजे व्हायरल व्हिडीओंचा खजिना आहे, असे म्हटले, तर ते वावगे ठरणार नाही. कधी लोकांचे अनोखे जुगाड पाहायला मिळतात; तर कधी लोकांना आश्चर्यचकित करणारे व्हिडीओ पाहायला मिळतात. व्हायरल होत असलेल्या या महिलेच्या व्हायरल व्हिडीओने आता अनोखा जुगाड दाखवला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. गृहिणींकडे काही ना काही घरगुती जुगाड असतात. अशाच एका गृहिणीने हा जुगाड दाखवला आहे. तिने आपल्या यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
महिलेने केळी आणि पेन यांचा भन्नाट असा जुगाड शेअर केला आहे. पेन आणि केळी याचा काय जुगाड असेल, हे वाचून तुम्हीही विचारात पडला असाल ना. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक हटके ट्रिक सांगितली आहे. या ट्रिकच्या मदतीने केळी खराब होणार नाहीत. केळी जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी ही युक्ती त्या महिलेने सांगितली आहे. केळे हे असे फळ आहे, जे दीर्घकाळ टिकू शकत नाही. फळे टिकण्यासाठी ती आपण फ्रिजमध्ये ठेवतो; मात्र त्याप्रमाणे केळी फ्रिजमध्ये ठेवता येत नाहीत. पण, ती बाहेर ठेवली तरी ती काळी पडून खराब होतात. मग केळी लवकर खराब होऊ नये यासाठी तुम्ही हा प्रयोग नक्की करून पाहा, असे या महिलेचे म्हणणे आहे.
तुम्हाला नेमकं काय करायचंय?
महिलेने व्हिडीओमध्ये सांगितल्यानुसार, केळ्यांचा एक घड घ्यायचा आहे. त्यानंतर एक पेन घेऊन त्याला एक दोरी बांधायची आहे. दोरी पेनाच्या मधोमध बांधायची आहे. मग ही दोरी केळ्यांच्या घडाच्या मध्यभागातून दुसऱ्या बाजूने बाहेर काढायची आहे. दोरीला असलेला पेन केळ्यांच्या घडाला अडकेल आणि दोरी व्यवस्थितपणे अडकली जाईल. अशा रीतीने तुम्ही कुठेही केळ्यांचा घड लटकवून ठेवला तर ती खराब होणार नाहीत. याउलट केळी कुठेही खाली ठेवलीत, तर वरच्या केळ्यांचा दाब त्याखालील केळ्यांवर पडतो आणि ती खराब होऊ शकतात. त्यामुळे केळी खाली ठेवण्याऐवजी अशा रीतीने पेन आणि दोरीच्या साह्याने लटकवून ठेवल्यास खालच्या केळ्यांवर दाब पडणार नाही आणि तुमच्याकडील केळी खराब होणार नाहीत, असे महिलेचे म्हणणे आहे.
येथे पाहा व्हिडीओ
Priti Rasoi या यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करून पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का, ते आम्हाला कमेंट करून कळवा.
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करीत नाही.)
