How To Remove Dark Circles In Home : अनेकदा सकाळी झोपेतून उठल्यावर डोळ्यांखाली काळे डाग दिसतात. या काळ्या डागांना ‘डार्क सर्कल’ असं म्हणतात. या काळ्या डागांमुळे डोळ्यांचं सौंदर्य तर बिघडतंच आणि चेहऱ्याचं सौंदर्यही कमी होते. तणाव, झोप न लागणे, अनहेल्दी पदार्थांचे सेवन आणि इतर अनेक कारणांमुळे तुमच्या डोळ्याखाली काळे वर्तुळे येऊ लागतात. यासाठी अनेक जण क्रीम वापरतात. पण, तुम्ही काय घरगुती उपाय सुद्धा करू शकता. तर सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओत डोळ्यांखाली काळे डाग दिसण्यावर जबरदस्त ५ घरगुती उपाय सांगितले आहेत; जे कदाचित तुमच्या कामी येतील.
डोळ्यांखालचे काळे डाग कमी करण्यासाठी काय करावं?
१. ताजी कोरफड – कोरफडीचा जेल डोळ्यांखाली लावावा आणि सकाळी चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.
२. बटाटा – बटाट्याचे काप करून डोळ्यांवर लावा किंवा बटाट्याचे रस करून डोळ्यांखाली लावा आणि चेहरा धुवून घ्या.
३. गुलाब पाणी – १० ते १५ मिनिटे गुलाब पाणी डोळ्याखाली लावून चेहरा धुवून घ्या.
४. बदाम तेल – रात्री झोपताना डोळ्याखाली लावून मालिश करा.
५. टोमॅटो – टोमॅटोचा रस काढून त्यात लिंबू पिळून घ्या. १० ते १५ मिनिटे तसाच ठेवा आणि चेहरा धुवून टाका.
तुम्ही या ५ पैकी एक घरगुती उपाय करून पाहू शकता असे सांगत आजीने याबरोबर चांगली झोप, संतुलित आहार आणि भरपूर पाणी प्या; ज्यामुळे डोळ्यांखालचे काळे डाग निघून जाण्यास आणखीन मदत होईल. तर सोशल मीडियावर हा व्हिडीओ @aapli_aaji या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
