vivah ke shubh muhurat 2022 these are the most auspicious time to get married in 2022 know best day and tithi prp 93 | Vivah Muhurat 2022: 2022 मध्ये लग्नासाठी 'हे' आहेत सर्वात शुभ मुहूर्त, जाणून घ्या लग्नासाठी कोणते दिवस उत्तम आहेत ? | Loksatta

Vivah Muhurat 2022: 2022 मध्ये लग्नासाठी ‘हे’ आहेत सर्वात शुभ मुहूर्त, जाणून घ्या लग्नासाठी कोणते दिवस उत्तम आहेत ?

लग्नसराईचा माहौल सुरू झाला आहे. पण १५ डिसेंबर २०२१ पासून मल मासामुळे पुन्हा एकदा विवाहांना ब्रेक लागणार आहे. त्यानंतर २०२२ मध्ये जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून पुन्हा सनई वाजू लागेल. जर तुम्हीही लग्न करणार असाल तर जाणून घ्या २०२२ मधील लग्नासाठीचे शुभ मुहूर्त…

Vivah Muhurat 2022: 2022 मध्ये लग्नासाठी ‘हे’ आहेत सर्वात शुभ मुहूर्त, जाणून घ्या लग्नासाठी कोणते दिवस उत्तम आहेत ?

लग्नसराईचा माहौल सुरू झाला आहे. पण १५ डिसेंबर २०२१ पासून मल मासामुळे पुन्हा एकदा विवाहांना ब्रेक लागणार आहे. त्यानंतर २०२२ मध्ये जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून पुन्हा सनई वाजू लागेल. जर तुम्हीही लग्न करणार असाल तर जाणून घ्या २०२२ च्या सर्व १२ महिन्यांत लग्नासाठी कोणते आणि किती शुभ मुहूर्त आहेत? याशिवाय काही शुभ दिवस असतील ज्या दरम्यान अक्षय्य तृतीया सारख्या दिवशी लग्न मुहूर्ताशिवाय करता येईल. ३ मे २०२२ रोजी होणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लग्न करणं खूप शुभ मानलं जातं.

२०२२ वर्षातील विवाह मुहूर्त

२०२२ मध्ये जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत विवाहसोहळ्यांचा मुहूर्त असणार आहे. या दरम्यान ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे महिने राहतील, ज्यामध्ये चातुर्मासामुळे लग्नाचा मुहूर्त नसेल.

आणखी वाचा : Vivah Panchami 2021: ‘या’ दिवशी लग्न करणारे लोक खूप दुःखी जीवन जगतात, याचे खास कारण पुराणात सांगितले आहे

जानेवारी २०२२: २२, २३, २४ आणि २५ जानेवारी २०२२ रोजी लग्न करणे शुभ राहील.

फेब्रुवारी २०२२: ५,६,७,९,१०,११,१२,१८,१९,२० आणि २२ फेब्रुवारी २०२२ रोजी लग्न करणे शुभ राहील.

मार्च २०२२: मार्च २०२२ मध्ये लग्नासाठी फक्त २ शुभ मुहूर्त आहेत. या महिन्याच्या ४ आणि ९ तारखेला लग्न करणे शुभ राहील.

एप्रिल २०२२: १४, १५, १६, १७, १९, २०, २१, २२, २३, २४ आणि २७ एप्रिल २०२२ रोजी लग्न करणे शुभ राहील.

मे २०२२ : मे २०२२ मध्ये २, ३ (अक्षय तृतीया), ९, १०, ११, १२,१५,१७, १८, १९, २०, २१, २६, २७ रोजी लग्न करणे शुभ राहील.

जून २०२२ : जून २०२२ मध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त १, ५, ६, ७, ८, ९, १०, ११, १३, १७, २३ आणि २४ तारखेला असेल.

जुलै २०२२ : जुलै महिन्यात लग्नासाठी शुभ मुहूर्त ४, ६, ७, ८ आणि ९ असेल.

नोव्हेंबर २०२२: नोव्हेंबर २०२२ मध्ये, विवाहासाठी २५, २६, २८ आणि २९ तारखेला शुभ मुहूर्त आहे.

डिसेंबर २०२२ : डिसेंबर २०२२ मध्ये लग्न करण्यासाठी १, २, ४, ७, ८, ९ आणि १४ तारखेला शुभ मुहूर्त असेल.

आणखी वाचा : Chanakya Niti: करिअरमध्ये यश मिळवायचं असेल तर चाणक्य नीतिच्या या ५ गोष्टी लक्षात ठेवा

लग्नासाठी शुभ दिवस आणि तारीख

धर्म आणि ज्योतिष शास्त्राप्रमाणे लग्नासाठी शुभ मुहूर्त आणि शुभ योग सांगितले आहेत. त्याचप्रमाणे लग्नासाठी शुभ दिवस आणि शुभ तारखाही सांगण्यात आल्या आहेत. या दिवशी आणि तारखांना लग्न करणे खूप शुभ असते. यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहते. पती-पत्नीचे भाग्य वाढते.

आणखी वाचा : Wedding Tips : लग्नाआधी तुमच्या जोडीदाराबद्दल या पाच गोष्टी आवर्जून जाणून घ्या, आयुष्य सुखी होईल

ज्योतिष शास्त्रानुसार सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे लग्नासाठी सर्वात अनुकूल मानले जातात. तर मंगळवार हा विवाहासाठी अशुभ मानला जातो. त्याचप्रमाणे द्वितीया तिथी, तृतीया तिथी, पंचमी तिथी, सप्तमी तिथी, एकादशी तिथी आणि त्रयोदशी तिथी विवाहासाठी खूप शुभ आहेत. तसेच अभिजीत मुहूर्त हा विवाहासाठी सर्वात शुभ आहे. याशिवाय गोधुली बेलामध्ये लग्न करणे उत्तम.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-11-2021 at 21:51 IST
Next Story
Chanakya Niti: करिअरमध्ये यश मिळवायचं असेल तर चाणक्य नीतिच्या या ५ गोष्टी लक्षात ठेवा