स्वस्त झाला Vivo चा चार रिअर कॅमेऱ्यांचा फोन, कंपनीकडून किंमतीत कपात

इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आणि 4,500 एमएएच क्षमतेची मोठी बॅटरी…

Vivo कंपनीने आपल्या Vivo S1 Pro या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. हा फोन जानेवारी महिन्यात भारतीय बाजारात लाँच करण्यात आला होता. अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही ई कॉमर्स संकेतस्थळांवरुन Vivo S1 Pro ची विक्री होते. हा स्मार्टफोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आणि 4,500 एमएएच क्षमतेच्या मोठ्या बॅटरीसाठी ओळखला जातो.

फीचर्स –
Vivo S1 Pro मध्ये 6.38 इंच सुपर एमोलेड डिस्प्ले असून इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनिंग फीचरही आहे. मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे, त्यात 48 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर आहे. तर अन्य दोन मेगापिक्सलचे दोन सेन्सर आहेत. त्यातील एक डेप्थ सेन्सिंग आणि एक मॅक्रो फोटोग्राफीसाठी आहे. याशिवाय सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर असलेला हा फोन केवळ 8जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 9.0 वर आधारित FunTouch OS 9.2 कार्यरत असून फोनमध्ये 4,500 mAh क्षमतेची फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली बॅटरी आहे.

(आणखी वाचा – 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा ‘हे’ बेस्ट स्मार्टफोन्स)

किंमत –
Vivo S1 Pro च्या किंमतीत कंपनीने दोन हजार रुपयांची कपात केली असून आता हा स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर 18 हजार 990 रुपये या किंमतीसह लिस्ट करण्यात आला आहे. आधी या स्मार्टफोनची किंमत 20 हजार 990 रुपये होती. पण, अद्यापही हा फोन ई-कॉमर्स संकेतस्थळांवर वेगवेगळ्या किंमतीमध्ये लिस्ट करण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Vivo s1 pro price cut in india know new price specifications and all other details sas

ताज्या बातम्या