भारतातून आपला गाशा गुंडाळणार असल्याची निव्वळ अफवा असल्याचे स्पष्टीकरण दिल्यानंतर व्होडाफोन कंपनीने आता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी निरनिराळे प्लान्स लाँच करण्यास सुरूवात केलीये. दोन दिवसांपूर्वीच कंपनीने 20, 30 आणि 50 रुपयांचे फुल टॉक टाइम असलेले रिचार्ज पॅक पुन्हा लाँच केलेत. त्यानंतर आता कंपनीने 39 रुपयांचा नवा ‘ऑल राउंडर प्लान’ लाँच केला आहे.

व्होडाफोन कंपनी निवडक क्षेत्रांमध्ये विविध ऑल राउंडर प्लान्स लाँच करत आहे. याशिवाय काही निवडक शहरांसाठी कंपनीने 29 आणि 15 रुपयांचे ‘ऑल राउंडर प्लान्स’ देखील लाँच केले आहेत.  35 रुपयांच्या टॉक टाइम प्लानपेक्षा 39 रुपयांचा ‘ऑल राउंडर प्रीपेड प्लान’ बराच वेगळा आहे. 39 रुपयांच्या प्लानमध्ये फुल टॉक टाइम मिळेल. यामध्ये 30 रुपये मुख्य टॉक टाइम आणि 9 रुपये अतिरिक्त टॉक टाइम मिळतो. या प्लानची वैधता सात दिवसांची असून यामध्ये 100MB डेटाची ऑफर आहे. यात आउटगोइंग कॉलिंगसाठी 2.5 पैसे प्रति सेकंद दर आकारला जाईल. यापूर्वी कंपनीने 45 रुपये आणि 69 रुपयांचे ‘ऑल राउंडर प्लान’ देखील लाँच केले आहेत.

आणखी वाचा –  दर महिन्याला 35 रुपये द्यायची गरज नाही, व्होडाफोनने आणले ‘स्वस्त’ प्लान्स

39 रुपयांशिवाय व्होडाफोनने काही निवडक शहरांमध्ये 29 रुपये आणि 15 रुपयांचा ऑल राउंडर प्लान लाँच केला आहे. या दोन्ही प्लान्समध्ये इंटरनेट डेटाची ऑफर नाहीये. केवळ कॉलिंगसाठी कमी दर हाच फायदा या प्लान्समध्ये आहे. दोन्ही प्लान्समध्ये आउटगोइंग कॉलिंगसाठी 30 पैसे प्रति मिनिट द्यावे लागतील. 15 रुपयांच्या प्लानची वैधता तीन दिवस आणि 29 रुपयांच्या प्लानची वैधता 7 दिवस आहे.