चालत कार्यालयीन चर्चेचा आरोग्याला फायदा

अभ्यासकांचा निष्कर्ष; आठवडय़ातून एकदा अशी चर्चा गरजेची

अभ्यासकांचा निष्कर्ष; आठवडय़ातून एकदा अशी चर्चा गरजेची

कंपनीतील बैठक म्हटली की डोळ्यांपुढे एक नेहमीचे टेबलावर बसून चर्चेचे चित्र येते. मात्र या नेहमीच्या पद्धतीपेक्षा आठवडय़ातून एकदा चालत चर्चा (मीटिंग) घेणे कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असल्याचे एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे.

कार्यालयात बहुतांश बैठे काम असते. त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. अशा वेळी ही पद्धत उपयुक्त आहे. त्यामुळे चालत चर्चा करण्याबाबत अभ्यास करण्यात आला. त्याचे निष्कर्ष उत्साहवर्धक असल्याचे मियामी विद्यापीठातील प्रा. अल्बटरे जे कॅबन मार्टीनेझ यांनी स्पष्ट केले. अशा चालत होणाऱ्या चर्चाना अधिकाधिक प्रोत्साहन द्यायला हवे, त्यातून कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

अशा चर्चामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींचा तीन आठवडे अभ्यास करण्यात आला. पहिल्या आठवडय़ात १०७ मिनिटांपासून ते तिसऱ्या आठवडय़ात ११७ मिनिटांपर्यंत क्षमतेत वाढ झाल्याचे चित्र दिसले. हे निष्कर्ष पाहता नोकरदार वर्गाला चालतच चर्चा घेणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते, असे मियामी विद्यापीठातील सार्वजनिक आरोग्य विज्ञान शाखेचे हनन किंग यांनी स्पष्ट केले. या पूर्वी एका अभ्यासात दररोज १५ मिनिटे जोरात चालतात त्यांचे आयुर्मान तीन वर्षांनी वाढल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळेच चालणे हा चांगला व्यायाम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच धर्तीवर चालत कार्यालयीन चर्चा केली तर फायदा होतो असे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Walking meetings healthy for health

ताज्या बातम्या