Walking On Green Grass: सकाळ, संध्याकाळ हिरव्यागार गवतावर चालल्याने आरोग्यास भरपूर फायदा मिळतो. तुम्ही जर अनवाणी सकाळच्या वेळेत हिरव्यागार गवतावर चालाल तर तुमचे हृदय निरोगी राहते. याशिवाय शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते, त्यामुळे मनातून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडू लागते. सकाळी हिरव्या गवतावर चालल्याने शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात. यामुळे शारीरिक आणि मानसिक ताण देखील कमी होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गवतावर अनवाणी चालल्याने पृथ्वीचे इलेक्ट्रॉन्स थेट मेंदूपर्यंत पोहोचतात, त्यामुळे मेंदूची क्रिया वाढते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे गवतावर अनवाणी चालणे रक्तवाहिन्यांच्या हालचालींना गती देते, ज्यामुळे त्या पसरू लागतात. म्हणजेच रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाह वाढतो. हिरव्या गवतावर चालण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया.

( ही ही वाचा: हिवाळ्यात पहाटेच्या वेळी वाढतो हार्ट अटॅकचा धोका; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी वेळीच जाणून घ्या, नाहीतर…)

हृदय निरोगी राहते

हिरव्यागार गवतावर अनवाणी चालल्याने पायांवर पडणाऱ्या दाबाचा थेट परिणाम मेंदूवर होतो. यामुळे हार्मोन्सची क्रिया वाढते. त्यामुळे रक्ताभिसरणाचा वेग वाढतो. हिरव्या गवतावर चालताना हृदयाचे ठोके आणि रक्तदाब संतुलित राहतो, त्यामुळे हृदयविकाराचा धोका खूप कमी होतो.

जळजळ आणि वेदना दूर होतात

हिरव्या गवतावर चालण्याने हिलींग क्षमता वाढते, त्यामुळे संसर्ग किंवा दुखापत झाल्यानंतर सूज येणे किंवा इन्फेक्शन होणे अशा समस्या लवकर दूर होतात.

( ही ही वाचा: High Uric Acid किडनी, लिव्हर आणि हृदयासाठी ठरते घातक; तज्ज्ञांनी सांगितलेले ‘हे’ ६ पदार्थ याला नियंत्रित करतात)

मानसिक आरोग्य चांगले राहते

हिरव्या गवतावर चालण्याचा परिणाम म्हणजे मानसिक आरोग्य चांगले राहते. मानसिकदृष्ट्या आपल्या मनावर सकारात्मक परिणाम होतो, त्यामुळे जर तुम्हाला मानसिकरित्या शांत राहायचे असेल तर सकाळी लवकर हिरव्या गवतावर अनवाणी चालावे.

झोपेच्या पद्धतींमध्ये सुधारणा होते

जर तुम्ही गवतावर अनवाणी चालत असाल तर तुम्हाला रात्री शांत झोप लागेल. हिरव्या गवतावर चालणे संपूर्ण झोपेचे स्वरूप सुधारते. गवतावर चालणे झोपेच्या गोळ्यासारखे काम करते.

( हे ही वाचा: ‘या’ ३ आजारांमध्ये शेंगदाणे करतात विषासारखे काम; जाणून घ्या आरोग्याला कशाप्रकारे पोहोचवतात हानी)

दृष्टी वाढेल

हिरव्या गवतावर अनवाणी चालल्याने दृष्टी सुधारते. एका संशोधनानुसार, गवतावर अनवाणी चालल्याने पायांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या घोट्यावर सर्वाधिक दबाव पडतो. या घोट्यांचा थेट संबंध डोळ्यांशी जोडलेला असतो, त्यामुळे अनवाणी चालणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Walking on green grass reduced the risk of heart disease know 4 benefits of it gps
First published on: 08-11-2022 at 20:23 IST