Green Vegetable for Diabetes Control: आजकाल बदललेली जीवनशैली, ताणतणाव व चुकीचा आहार यांमुळे अनेक आजार कमी वयातच शरीराला जखडू लागले आहेत. विशेषतः डायबिटीज, लठ्ठपणा, पचनाचे त्रास व हाडे कमकुवत होणे अशा समस्या झपाट्याने वाढताना दिसत आहेत. अनेक लोक औषधांवर अवलंबून राहतात; पण आपल्या रोजच्या आहारात असलेल्या काही साध्या भाज्या आरोग्यासाठी किती फायदेशीर ठरू शकतात, याकडे मात्र अनेकांचे दुर्लक्ष होते.

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, काही भाज्या अशा असतात की, त्या केवळ शरीराला पोषण देत नाहीत, तर अनेक आजारांपासून बचाव करण्यासही मदत करतात. विशेष म्हणजे या भाज्या बाजारात सहज उपलब्ध असतात; पण त्यांचे खरे महत्त्व आपल्याला माहीत नसते. अशाच एका साध्या दिसणाऱ्या हिरव्या भाजीबद्दल तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. या भाजीचे सेवन आठवड्यातून काही दिवस केल्यास शरीराला अनेक फायदे मिळू शकतात, असा दावा करण्यात येतो.

शुगर नियंत्रणासाठी फायदेशीर

डायबिटीज हा आजकाल अत्यंत सामान्य झालेला आजार आहे. वेळेवर नियंत्रण न ठेवल्यास तो हृदय, किडनी आणि फुप्फुसांवर गंभीर परिणाम करू शकतो. तज्ज्ञांच्या मते, या हिरव्या भाजीमध्ये डाएटरी फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे ती खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. परिणामी शर्करेचे शोषण हळूहळू होते आणि शरीराला दिवसभर ऊर्जा मिळत राहते.

पचनसंस्थेसाठी वरदान

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना अपचन, पोट फुगणे, अॅसिडिटी व बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या भेडसावत असतात. या भाजीतील तंतुमय घटक पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात. त्याचे नियमित सेवन केल्यास आतड्यांची कार्यक्षमता सुधारते आणि पोट साफ राहण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी उपयोगी

लठ्ठपणा ही सध्याची मोठी समस्या बनली आहे. कमी कॅलरीज आणि जास्त पोषणमूल्ये असलेली ही भाजी वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय मानली जाते. ती पोट भरल्याची भावना देते आणि शरीराला आवश्यक पोषक घटक पुरवते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे सोपे जाते.

हाडांना मिळते बळकटी

वाढत्या वयात हाडांची झीज होणे ही सामान्य बाब आहे. या हिरव्या भाजीमध्ये कॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते. त्यामुळे हाडे आणि दात मजबूत राहण्यास मदत होते. विशेषतः मध्यम वयात हाडांच्या आरोग्यासाठी ही भाजी उपयुक्त ठरू शकते.

शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यास मदत

आपल्या शरीरात रोज विविध प्रकारचे टॉक्सिन्स (विषारी द्रव्ये) जमा होत असतात. ही भाजी नैसर्गिक डिटॉक्ससारखी काम करते. तिच्या मूत्रवर्धक गुणांमुळे शरीरातील घातक द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते आणि यकृत व किडनीचे आरोग्य सुधारण्यास हातभार लागतो.

अखेर ही भाजी कोणती?

इतके फायदे असलेली ही साधी दिसणारी हिरवी भाजी म्हणजे तोंडली. या भाजीला हिंदीमध्ये कुंद्रू असेही म्हटले जाते. ही भाजी भोपळा कुळातील असून, महाराष्ट्रासह भारतातील अनेक भागांत ती सहज उपलब्ध होते. आकाराने लहान आणि साधी वाटणारी ही भाजी प्रत्यक्षात आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी मानली जाते. त्यामुळे आठवड्यातून काही वेळा तोंडलीचा आहारात समावेश केल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.