Warm Water & Lemon Bath: ऑक्टोबर महिना हा सण-उत्सवांप्रमाणेच ‘ऑक्टोबर हिट’ साठी सुद्धा ओळखला जातो. उष्णता म्हटली की घाम आलाच आणि घाम म्हणजे चिडचिड, शरीराला येणारा दुर्गंध, इत्यादी, इत्यादी.. या सगळ्यावर आपण आज एक असा उपाय पाहणार आहोत जो वर्षानुवर्षे आपल्या आजी- आईने सुद्धा फॉलो केला आहे. तो म्हणजे आंघोळीच्या पाण्यात लिंबाची साल टाकणे. लिंबू हा आकाराने लहानसा असला तरी त्याचे गुण अनेक आहेत. ऑफिसमध्ये चिडचिड झालेली असो किंवा गणपतीत फिरून आल्यामुळे चेहऱ्यावर आलेला टॅन असो, सगळ्यावर लिंबाची साल काही दिवसात उपाय करू शकते. त्यामुळे तुम्हीही तुमच्या आंघोळीच्या पाण्यात लिंबू का टाकावा याविषयी पाच सोप्या मुद्द्यांमधून जाणून घेऊया ..
आंघोळीच्या पाण्यात लिंबाची साल का घालावी?
१) सर्वात मुख्य फायदा म्हणजे लिंबाच्या सुगंधामुळे तुम्हाला फ्रेश वाटू शकते. एखाद्या थकवणाऱ्या दिवसाच्या शेवटी छान कोमट पाण्यात लिंबाच्या साली टाकून आंघोळ केल्याने मूड रिलॅक्स होऊ शकतो. यासाठी लिंबाच्या सुगंधाची अनेक उत्पादने सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत पण अस्सल लिंबाच्या साली अधिक नैसर्गिक परिणाम दाखवू शकतात.




२) लिंबाच्या रसामुळे त्वचेचा टॅन किंवा गडदपणा कमी होण्यास मदत होते असे मानले जाते. पण एक लक्षात ठेवा लिंबाचा रस थेट त्वचेवर लावल्यास सेन्सिटिव्ह त्वचेला झोंबण्याची शक्यता असते. त्यामुळे एकतर पाणी उकळतानाच त्यात लिंबाची साल टाका अन्यथा लिंबाची साल थोडी नरम होईपर्यंत पाण्यात टाकून ठेवा.
३) लिंबामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असल्याने यातील अँटी ऑक्सिडंट सत्व तुमच्या त्वचेचे फ्री रॅडिकलमुळे होणारे नुकसान टाळू शकतात.
४) आपल्या शरीराची सर्वात कोरडी त्वचा म्हणजेच कोपर- ढोपर यांच्यावरील काळे डाग काढण्यासाठी सुद्धा लिंबाचा वापर करता येऊ शकतो. लिंबाच्या सालीचा स्क्रब म्हणून वापर करता येऊ शकतो.
हे ही वाचा<< ‘या’ ५ पदार्थांवर लिंबू पिळून खाणं पोटासाठी ठरू शकतं विषारी; तुम्हालाही ऍसिडिटी होत असेल तर आधी वाचा
५) कोमट पाण्यात मिसळून लिंबाची साल आंघोळीसाठी वापरल्याने डोकं शांत होतं परिणामी रक्ताभिसरण व शरीराच्या अन्य कामाला योग्य गती मिळू शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला सुद्धा घ्या)