Washing Machine Care Tips : वाशिंग मशीनमुळे कपडे धुणे सोपे होते आणि आपली मेहनतही वाचते. परंतु, जेव्हा तुम्ही मशीनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कपडे भरता (ओव्हरलोड करता), तेव्हा केवळ मशीनचेच नाही तर कपड्यांचेही नुकसान होते. वॉशिंग मशीनमध्ये एकाच वेळी जास्त कपडे टाकल्यामुळे तिचे बेअरिंग घासले जाते, ज्यामुळे मशीनमधून घासल्यासारखा मोठा आवाज येऊ लागतो.
अनेकदा काही वर्किंग महिला शनिवार आणि रविवारी एकाच वेळी संपूर्ण आठवड्याचे कपडे धुतात. काम लवकर उरकण्याच्या नादात त्या बऱ्याचदा वॉशिंग मशीनमध्ये जास्त कपडे टाकतात. अशाने मशी लवकर खराब होते, यात मशीनचे ‘सस्पेन्शन सिस्टम’ खराब होते, यामागच मुख्य कारण ओव्हरलोडिंगआहे.
एकाच वेळी जास्त कपडे धुण्याच्या त्यांच्या या सवयीमुळे मोटरवर अतिप्रमाणामध्ये ताण पडतो, ज्यामुळे मशीनचे आयुष्य कमी होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या वॉशिंग मशीनवर जास्त ताण देऊ नये. जाणून घेऊया मशीन ओव्हरलोड करणे कशा प्रकारे नुकसानकारक ठरू शकते.
मशीन ओव्हरलोड केल्याने काय होते?
जेव्हा तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये गरजेपेक्षा जास्त कपडे टाकता, तेव्हा मशीनवर विविध प्रकारचा ताण पडतो. कपडे स्वच्छ धुण्यासाठी मशीन पाण्याचे समान वाटप करते. मात्र, खूप जास्त कपडे टाकल्यास या प्रक्रियेत अडथळा येतो. कपडे आतमध्ये व्यवस्थित फिरू शकत नाहीत आणि पर्यायाने मोटरवरचा ताण वाढतो; कारण मोटरला जास्त वजन पेलण्यासाठी अतिरिक्त ताण लावावा लागतो.
यामुळे समस्यांची अशी एक साखळी सुरू होते, ज्याचा थेट परिणाम कपड्यांच्या स्वच्छतेपासून ते मशीनच्या टिकाऊपणावर (Life) होतो.
वॉशिंग मशीनमध्ये जास्त कपडे टाकण्याचे नुकसान
जर तुमची मशीन कपड्यांनी गच्च भरलेली असेल, तर पाणी आणि डिटर्जेंट (साबण) कपड्यांमध्ये व्यवस्थित फिरू शकत नाही. ड्रमचे संतुलन बिघडू शकते, ज्यामुळे ‘स्पिन सायकल’ (कपडे सुकवताना) दरम्यान मशीन जोराने हलू लागते आणि मोठा आवाज येतो. अनेकदा तुमची वॉशिंग मशीन सुरक्षेच्या कारणास्तव (Safety Mechanisms ऍक्टिव्ह झाल्यामुळे) मध्येच बंद पडू शकते.
कपड्यांच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम
१) जास्त कपड्यांनी भरलेली मशीन कपडे नीट स्वच्छ करू शकत नाही.
२) कपडे एकमेकांमध्ये अडकतात, ज्यामुळे साबण आणि पाणी कपड्याच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचत नाही.
३) कपडे अस्वच्छच राहतात.
४) कपड्यांवर डिटर्जेंटचे पांढरे डाग राहतात किंवा कपडे जास्त आवळले गेल्यामुळे ते फाटू किंवा खराब होऊ शकतात.
५) मशीन ओव्हरलोड झाली हे कसे ओळखायचे?
६) स्पिनिंग दरम्यान मशीन अत्यंत जोराने थरथरणे किंवा हलणे.
७) कपडे धुतल्यानंतरही त्यावर साबणाचा फेस किंवा डाग राहणे.
८) कपडे धुण्यासाठी नेहमीपेक्षा खूप जास्त वेळ लागणे.
९) कोणतीही पूर्वसूचना न देता मशीन अचानक बंद पडणे.
१०) मशीनमधील पाणी व्यवस्थित बाहेर न पडणे.
वॉशिंग मशीन ओव्हरलोड होण्यापासून कशी वाचवावी?
१) ड्रम केवळ दोन-तृतीयांश (२/३) भागापर्यंतच भरावा.
२) कपड्यांना आतमध्ये सहज फिरण्यासाठी पुरेशी जागा ठेवा.
३) कपड्यांचे प्रकार आणि मळकटपणानुसार ते वेगळे करून धुवा.
४) घोंगड्या, ब्लँकेट किंवा चादरी सारख्या मोठ्या वस्तू नेहमी एकट्याच धुवाव्यात.
५) मॅन्युफॅक्चररने (कंपनीने) ठरवून दिलेली वजनाची मर्यादा नेहमी तपासून घ्या.
