scorecardresearch

चिटर जॅकेट खराब होऊ नये म्हणून धुताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या…

चिटर जॅकेट धुताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी जाणून घ्या

चिटर जॅकेट खराब होऊ नये म्हणून धुताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या…
चिटर जॅकेटबाबतच्या उपयुक्त टिप्स (Photo: Freepik)

हिवाळ्यात थंडीपासून वाचण्यासाठी गरम कपडे परिधान केले जातात. आता हळुहळु थंडीचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे अनेकजण बाहेर जाताना स्वेटर, हुडी, जॅकेट असे कपडे सोबत ठेवतात. या कपड्यांनाही आता फॅशनची जोड मिळाली आहे. वेगवेगळ्या पॅटर्नचे, वेगवेगळ्या लूकप्रमाणे असे कपडे निवडले जातात. यातीलच एक चिटर जॅकेट सध्या ट्रेंडमध्ये आहे. अनेकजण चिटर जॅकेट वापरत असलेले तुम्ही पाहिले असेल. पण ते धुण्याबाबत अनेकांना माहिती नसते.

जॅकेटमधील कोणताही प्रकार किंवा गरम कपडे धुणे अनेकांना त्रासदायक वाटते. कारण त्यांची नीट काळजी घेतली नाही तर ते खराब होण्याची शक्यता असते. चिटर जॅकेट धुताना काही गोष्टींची काळजी घेतली तर ते खराब होण्यापासून वाचवता येईल. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घ्या.

चिटर जॅकेट धुताना पुढील गोष्टी लक्षात ठेवा

वॉशिंग मशीनमध्ये धुणे टाळा
चिटर जॅकेट वॉशिंग मशीनमध्ये न धुता हाताने धुवावे. वॉशिंगमशीनमध्ये धुतल्यास जॅकेट सैल होऊन खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे असे जॅकेट थोडा वेळ भिजत ठेऊन हाताने धुण्याचा सल्ला दिला जातो.

हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी ‘हे’ पदार्थ करतील मदत; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश

व्हिनेगर वापरा
चिटर जॅकेट धुण्यासाठी व्हिनेगर देखील वापरता येते. यासाठी एक लिटर पाण्यात थोडे डिटर्जंट आणि एक दोन चमचे व्हिनेगर टाका. या पाण्यात १० मिनिटांसाठी जॅकेट भिजत ठेवा आणि त्यानंतर हाताने हे जॅकेट धुवून घ्या.

उन्हात वाळवणे टाळा
चिटर जॅकेट उन्हात वाळवणे टाळा कारण यामुळे त्याचा रंग फिकट होण्याची शक्यता असते. त्यामुळे जॅकेट उलट करून हलक्या उन्हात सुकवावे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-01-2023 at 13:36 IST

संबंधित बातम्या