what is the best way to eat chia seeds : वजन नियंत्रित ठेवण्यासाठी उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी अनेक जण आहारात चिया सीड्सचा समावेश करताना दिसतात. कधी फळांची स्मूदी म्हणून, तर कधी सॅलडमध्ये, तर कधी पिण्याच्या पाण्याच्या बाटलीत चिया सीड्स टाकून, त्याचे सेवन केले जाते. चिया सीड्समध्ये फायबर, ओमेगा-३ फॅटी ॲसिड, प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखी आवश्यक पोषक तत्त्वे असतात. पण, पाणी की दह्याबरोबर कशा प्रकारे चिया सीड्सचे सेवन केल्याने आरोग्याला फायदा होतो याबद्दल अनेक जणांना प्रश्न पडतो. तर या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत…
१६ वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या प्रसिद्ध आहारतज्ज्ञ व पोषण सल्लागार सिमरत कथुरिया स्पष्ट करतात की, याचे उत्तर प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याच्या उद्दिष्टांवर आणि पचनसंस्थेच्या गरजांवर अवलंबून असते.
पाण्याबरोबर चिया सीड्स
चिया सीड्समध्ये असणारे फायबर पाणी शोषून घेते. पाणी शोषून घेतल्यावर बियांच्या बाहेर जेलसारखा थर तयार होतो. या प्रक्रियेमुळे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात, ज्यामध्ये उत्तम पचन, नियमित शौचास होणे आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढणे यांचा समावेश आहे. रिकाम्या पोटी चिया पाण्याचे सेवन केल्याने भूक कमी लागते , ज्यामुळे लोकांना वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. ज्या लोकांना पचनाच्या समस्या आहेत, त्यांच्यासाठी चिया सीड्स उत्तम आहे. कारण- त्याच्या हलक्या स्वरूपामुळे शरीर कोणत्याही अडचणीशिवाय त्याला पचवू शकते.
दह्याबरोबर चिया सीड्स
चिया सीड्स दह्यासोबत खाल्ल्यामुळे शरीराला प्रो-बायोटिक्स, कॅल्शियम आणि अतिरिक्त प्रथिने मिळवण्यात आणखीन भर घालतात. दही आणि चिया सीड्स एकत्र खाल्यास आतड्यांचे आरोग्य राखण्यास मदत होते. या दोन पदार्थांच्या मिश्रणामुळे पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे नाश्ता आणि जेवणाच्यामध्ये जो वेळ असतो, तेच सेवन करण्यासाठी योग्य ठरते. त्यामुळे हाडांची ताकद वाढवते आणि दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करते.
ज्या लोकांना लॅक्टोज असहिष्णुता किंवा दुग्धजन्य पदार्थांची संवेदनशीलता आहे, त्यांच्यासाठी चिया सीड्सचे पाणी हा एक चांगला पर्याय आहे.
तसेच दुसऱ्या बाजूने विचार केला, तर दुधाच्या तुलनेत दह्याचे पचन सोपे ठरते. तरीही काही व्यक्तींना त्याचे सेवन केल्यानंतर पचनाच्या समस्या जाणवतात.
त्यामुळे या दोन्ही पद्धतींमध्ये चिया सीड्स योग्य प्रकारे भिजवणे आवश्यक आहे. कारण- न भिजवलेल्या सीड्समुळे पचनाच्या समस्या उदभवू शकतात.
प्रमाण आणि खबरदारी
तज्ज्ञ एका वेळी एक ते दोन चमचे चिया सीड्स खाण्याची शिफारस करतात. कारण- त्यापेक्षा जास्त सेवन केल्यामुळे पोट फुगण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे ज्या लोकांना त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्याची गरज असते, त्यांच्यासाठी हायड्रेशनच्या इतर पद्धतींपेक्षा चिया सीड्सचे पाणी अधिक चांगले परिणाम देऊ शकते.
फक्त चिया सीड्सपेक्षा दह्यामध्ये मिसळलेल्या चिया सीड्स अधिक समाधानकारक आणि पौष्टिक पर्यायसुद्धा ठरतात, हेही विसरून चालणार नाही. त्यामुळे लोकांनी त्यांच्या आरोग्याच्या विशिष्ट गरजा आणि वजन नियंत्रणाच्या उद्दिष्टांनुसार चिया सीड्स कशाबरोबर खावे त्याची निवड करावी.
