तुम्ही जेव्हा कपड्यांच्या दुकानात शर्ट किंवा टी-शर्ट खरेदी करण्यासाठी जाता तेव्हा तुमच्यासमोर शर्टची क्वालिटी, रंगाबरोबर योग्य साइज निवड्याचे मोठे आव्हान असते. काहीवेळी तुम्हाला एखादा शर्ट खूप आवडतो तो तुमच्या साइजचा मिळत नाही. अशावेळी नेमका कोणता शर्ट किंवा टी-शर्ट खरेदी करायचा असा प्रश्न पडतो. पण हे शर्ट किंवा टी-शर्टवर खरेदी करताना त्यावर तुम्हाला XL आणि XXL असे लिहिले दिसते. पण त्याचा नेमका अर्थ काय असतो हे तुम्हाला माहित आहे का? अनेकांना याचा नेमका अर्थ माहित नसेल त्यामुळे तो आपण आज जाणून घेऊ….
XL चा अर्थ काय आहे?
तुम्हाला वेगवेगळ्या साईजमध्ये कपडे मिळतात, यात S, XS, M, L याणि त्यापुढे काही साइज असतात, यातील S चा अर्थ Small, XS चा अर्थ Extra Small, M चा अर्थ Medium आणि L चा अर्थ Large असा असतो. यापुढे XL, XXL, XXXL अशा साइजचे कपडे असतात, जे साइजला खूप मोठे असतात. तुमच्या शरीरानुसार या साइज ठरवलेल्या असतात. त्यामुळे जर तुम्हाला कोणी असा प्रश्न विचारला की, XL म्हणजे काय, तर तुम्ही त्यांना सांगा की XL म्हणजे extra large. म्हणजे अधिक मोठा. XL साइजच्या शर्टच्या छातीची साइज 42-44 इंच असते, तर कंबर 36-38 इंच आणि नितंबांची साइज 42-44 इंच असते. आता जेव्हा तुम्ही शर्ट खरेदी करायला जाल आणि तेव्हा तुम्हाला तुमची नेमकी साइज काय असेल हे समजत नसेल, तर तुम्ही छाती आणि कंबरेची साइज मोजा, यावरुन तुम्हाला नेमक्या कोणत्या साइजचे शर्ट होऊ शकते हे समजेल. ही साइज सामान्य साइजपेक्षा थोडी मोठी असते. यामुळे कपड्यांच्या साइजमध्ये X हा Extra या अर्थाने वापरला जातो.
XXL साइजचे कपडे किती मोठे असतात?
XXL म्हणजे एक्स्ट्रा एक्स्ट्रा लार्ज, म्हणजे खूप जास्त मोठा. या साइजचे शर्ट किंवा टी-शर्टच छातीकडे 44-46 इंच आहे. तर कंबरेला 38-40 इंच इतक्या मापाचे असते. याच नितंबांची साइज 44-46 इंच असते. ज्यांचे वजन थोडेसे जास्त असते आणि जे शरीराने खूप धिप्पाड असतात, त्यांना या साइजचे कपडे एकदम परफेक्ट बसतात. अनेकवेळा शरीराचे वजन वाढल्यास त्या व्यक्तीला या आकाराचा शर्ट घालावा लागतो.