weight according to height and age : तुम्हाला वारंवार थकवा जाणवतो का? किंवा तुमच्या वजनात अचानक चढ-उतार होत आहेत का? अनेकदा आपण स्वतःला तंदुरुस्त समजतो; मात्र वाढत्या वयानुसार आपले वजन आरोग्यदायी मर्यादेत आहे की नाही, याकडे लक्ष देणे गरजेचे असते. पुरुष आणि महिलांची शारीरिक रचना, हार्मोन्स आणि चयापचयामध्ये फरक असल्याने त्यांच्या वजनातही वयानुसार वेगवेगळे बदल होऊ शकतात. वयाच्या २०व्या वर्षी योग्य वाटणारे वजन ४० किंवा ५०व्या वर्षीही योग्य असेलच असे नाही. त्यामुळे वयानुसार योग्य वजन किती असावे, याबाबत तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांना संभ्रम असेल तर ही बातमी अगदी शेवटपर्यंत वाचा…

प्रमाणित आहारतज्ज्ञ, पोषणतज्ज्ञ आणि फिटनेस प्रशिक्षक अभिलाषा सिंग यांच्या मते, वय आणि उंचीच्या तुलनेत जास्त वजन असणे केवळ दिसण्यावर परिणाम करत नाही. तर आरोग्यावरही परिणाम करू शकते. अतिरिक्त वजनामुळे उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आणि इतर आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो. तसेच, जास्त वजनाचा पीसीओडी आणि थायरॉईडसारख्या स्थितींशीही संबंध असू शकतो. त्यामुळे वय आणि उंचीनुसार निरोगी वजन किती असावे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

तुमच्या वयानुसार तुमचे वजन किती असावे?

लोकांना अनेकदा जाणून घ्यायचे असते की, त्यांच्या वयानुसार त्यांचे वजन किती असावे. पण, केवळ वयाच्या आधारावर एखाद्या व्यक्तीचे आदर्श वजन ठरवता येत नाही. वजनाचा अंदाज लावताना, उंची, वय, लिंग, शारीरिक रचना आणि आरोग्य यांसारख्या अनेक घटकांचा विचार करणे महत्त्वाचे आहे. जन्मापासून ते बालपण, पौगंडावस्था, तारुण्य, मध्यम वय आणि वृद्धावस्थेपर्यंत शरीरात होणाऱ्या बदलांनुसार वजनात बदल होतो. या तक्त्याच्या मदतीने वेगवेगळ्या वयात वजनात कसा बदल होतो आणि कोणते वजन सामान्य मानले जाते हे सुद्धा समजून घेऊ.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) शरीर वस्तुमान निर्देशांक (BMI) ची श्रेणी

BMI १८.५ पेक्षा कमी : कमी वजनाचे (Underweight) मानले जाते.
BMI १८.५ ते २४.९ : सामान्य वजनाच्या श्रेणीत येते.
BMI २५.९ ते २९.९ : जास्त वजनाचे (Overweight) मानले जाते.
BMI ३०.० किंवा त्याहून अधिक : लठ्ठपणाच्या (Obesity) श्रेणीत येते.

उम्रमुलगा / पुरुष मुलगी / स्त्री
जन्मल्यावर३.३ किलो३.२ किलो
३ ते ५ महिने६ किलो५.४ किलो
६ ते ८ महिने७.२ किलो६.५ किलो
९ ते ११ महिने९.२ किलो६.८ किलो
१ वर्ष१०.२ किलो६,९ किलो
२ वर्ष१२.३ किलो११.८ किलो
३ ते ४ वर्ष१४ ते १६ किलो१४ ते १६ किलो
५ वर्ष१८.७ किलो१७.७ १४ ते १६ किलो
७ ते ८ वर्ष२२ ते २५ किलो२२ ते २४ किलो
९ वर्ष२८ किलो२६.५ किलो
१० ते ११ वर्ष३१.४ ते ३२.२ किलो३५.५ ते ३१.७ किलो
१२ ते १४ वर्ष३२ ते ३८ किलो३२ ते ३६ किलो
१५ ते २० वर्ष४० ते ५० किलो४५ किलो
२१ ते ३० वर्ष६० ते ७० किलो५० ते ६० किलो
३१ ते ४० वर्ष६० ते ७५ किलो६० ते ६५ किलो
४० ते ७० वर्ष६० ते ७० किलो५८ ते ६३ किलो

उंचीनुसार वजन

उंची (फूट / इंच) उंची (सेमी) WHO नुसार योग्य वजनाची श्रेणी (किलो)
४’१०१४७ Cm४१ ते ५२ किलो
५’०१५२ Cm४४ ते ५६ किलो
५’२१५७ Cm४६ ते ६० किलो
५’४१६२ Cm४९ ते ६४ किलो
५’६१६७ Cm५२ ते ६९ किलो
५’८१७२ Cm५५ ते ७३ किलो
५’१०१७७ Cm५९ ते ७७ किलो
६’०१८२ Cm६२ ते ८२ किलो

० ते १० वर्षांच्या मुलांसाठी तक्ता

वयमुलांचे सरासरी वजन (किलो)मुलींचे सरासरी वजन (किलो)
जन्माच्या वेळी३.३ किलो३.२ किलो
६ महिने७.९ किलो७.३ किलो
१ वर्ष९.६ किलो८.९ किलो
२ वर्ष१२.०२ किलो११.५ किलो
३ वर्ष१४. ३ किलो१३.९ किलो
५ वर्ष१८.३ किलो१८.२ किलो
८ वर्ष२५.६ किलो२५.०२ किलो
१० वर्ष३१.२ किलो३१.९ किलो

महिला आणि पुरुषांचे उंचीनुसार योग्य वजन

उंची (फूट / इंच)उंची (सेमी)महिलांचे योग्य वजन (किलो)पुरुषांचे योग्य वजन (किलो)
४’१०१४७ cm४१ ते ५२ किलो४४ ते ५५ किलो
५’०१५२cm४१ ते ५५ किलो४७ ते ५८ किलो
५’२१५७cm४६ ते ५९ किलो५० ते ६२ किलो
५’४१६२cm४९ ते ६३ किलो५३ ते ६७ किलो
५’६१६७cm५२ ते ६७ किलो५७ ते ७२ किलो
५’८१७२cm५५ ते ७१ किलो६१ ते ७६ किलो
५’१०१७७cm५९ ते ७५ किलो६५ ते ८१ किलो
६’०१८२cm६२ ते ८० किलो७० ते ८६ किलो