पावसाळा सुरू झाला की आपण सहसा बाहेरील साचलेले घाण पाणी व चिखलाला इन्फेक्शनसाठी कारणीभूत मानतो. पण, त्वचारोग तज्ज्ञांच्या (Dermatologists) मते, खरा धोका तुमच्या घरातच दडलेला असतो. पावसाळ्यातील दमट हवामानामुळे (Humidity) घरात रोज वापरले जाणारे टॉवेल, बेडशीट, सोफ्याचे कुशन आणि अगदी दारासमोरील पायपुसणी (Door mats) फंगल इन्फेक्शन व स्किन ॲलर्जीचे ‘सायलेंट ॲक्टिव्हेटर’ बनतात. जर या ऋतूत तुमच्या त्वचेवर अचानक खाज किंवा लाल चट्टे दिसू लागले असतील, तर बाहेर पाहण्याऐवजी आधी घरातील गोष्टींवर नजर टाका.
दिल्ली-एनसीआरमधील ‘स्किन अँड लेझर क्लिनिक’चे वरिष्ठ त्वचाविकार तज्ज्ञ, संचालक डॉ. अमित बांगिया यांनी या संदर्भात ‘जनसत्ता’शी बोलताना अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. पावसाळ्यात हवेतील ओलावा व भिंतीवरील ओलव्यामुळे केवळ बाहेरच नाही, तर घरात ठेवलेल्या अनेक गोष्टींमध्ये बुरशी (Fungus) व बॅक्टेरिया अतिशय वेगाने वाढू लागतात. यामुळे त्वचेवर रॅशेस, ॲलर्जी व फंगल इन्फेक्शनचा धोका अनेक पटींनी वाढतो. पावसाळा सुरू झाला की हवेतील गारवा वाढतो जो बॅक्टेरिया व फंगसच्या वाढीसाठी सर्वात अनुकूल मानला जातो.
पावसाळ्यात बॅक्टेरिया व बुरशी वेगाने का वाढतात? (Why Fungus and Bacteria Grow Fast in Monsoon?)
डॉक्टरांच्या मते, फंगस (बुरशी) वाढण्यासाठी सर्वात जास्त गरज ओलाव्याची (Moisture) असते. तर दुसरीकडे, बॅक्टेरियांना ओलाव्यासह सुमारे ३० ते ३५ अंश सेल्सिअस तापमान मिळाले की त्यांचे वातावरण अधिक अनुकूल होते. मान्सूनमध्ये नेमकी हीच परिस्थिती निर्माण होते, ज्यामुळे संसर्ग वेगाने पसरतो.
कोणाला असतो सर्वाधिक धोका? (Who is at Higher Risk?)
डॉ. अमित बांगिया यांच्यानुसार, काही लोकांमध्ये हा संसर्ग होण्याचा धोका इतरांपेक्षा जास्त असतो:
- डायबिटीज (मधुमेह) रुग्ण: ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) कमकुवत असते, त्यांच्यासाठी हे फंगस मोठी समस्या ठरू शकते.
- वृद्ध अन् लहान मुले: यांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने ते फंगल अन् बॅक्टेरियल इन्फेक्शनच्या विळख्यात लवकर सापडतात, त्यामुळे त्यांना बरे होण्यासही जास्त वेळ लागतो.
फंगल इन्फेक्शनची सुरुवातीची लक्षणे (Early Symptoms of Fungal Infection)
पावसाळ्यात त्वचेवर खालील लक्षणे दिसल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका:
- त्वचेवर सतत तीव्र खाज सुटणे.
- त्वचा लाल होणे किंवा त्यावर चट्टे पडणे.
- गोलाकार आकाराचे दाणे किंवा रॅशेस (Ringworm) होणे.
- त्वचा सोलवटणे
- इन्फेक्शन असलेल्या त्वचेतून दुर्गंधी येणे.
- पायाच्या बोटांच्या फटींमध्ये पांढरी किंवा ओली त्वचा होणे (चिखल्या होणे).
घरातील ‘या’ गोष्टी ठरू शकतात संसर्गाचे कारण (Reasons of Triggers of Infection)
डॉक्टरांच्या मते, पावसाळ्यात टीनिया (Ringworm) व कँडिडा संसर्ग सर्वात जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. अशा वेळी घरातील पुढील ५ गोष्टींवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे:
१. कपडे आणि कपाट (Clothes and Closets):
पावसाळ्यात बंद कपाटांमध्ये ओलावा टिकून राहतो, ज्यामुळे कपड्यांना बुरशी लागण्याचा धोका असतो. कपड्यांमधून कुबट वास येत असल्यास त्यात फंगस तयार झाल्याचे समजावे. सुती (Cotton) कपडे ओलावा लवकर शोषून घेतात. त्यामुळे या ऋतूत कपडे व्यवस्थित इस्त्री करून अथवा पूर्णपणे सुकवूनच कपाटात ठेवा व परिधान करा.
२. ओले टॉवेल आणि अंतर्वस्त्रे (Wet Towels and Undergarments):
ओला टॉवेल, ओले मोजे किंवा अंडरगार्मेंट्स जास्त वेळ वापरणे किंवा ते सुक्या कपड्यांसोबत कपाटात एकत्र ठेवणे ही मोठी चूक ठरू शकते. एका ओल्या कपड्यामुळे कपाटातील सर्व कपड्यांमध्ये फंगस पसरू शकते. कपड्यांमधील मॉइश्चर नियंत्रित करण्यासाठी तुम्ही कपाटात काही वेळ बल्ब पेटवून ठेवू शकता.
३. बाथ मॅट व इतर फॅब्रिक्स (Bath Mats and Other Fabrics):
बाथ मॅट (पायपुसणी), उशीचे कव्हर, बेडशीट या गोष्टी दीर्घकाळ दमट राहिल्यास फंगस वेगाने वाढते. या गोष्टी वेळोवेळी धुणे, पूर्ण सुकवूनच वापरणे अत्यंत आवश्यक आहे.
४. अस्वच्छ भांडी आणि साचलेले पाणी (Dirty Utensils and Stagnant Water):
केवळ कपडेच नाही तर घरात पडलेली अस्वच्छ भांडी, दीर्घकाळ उघडे राहिलेले पाणी व शिळे अन्न यामुळेही बॅक्टेरिया वेगाने वाढतात. पावसाळ्यात अशा अन्नाचे सेवन केल्यास गॅस्ट्रोएन्टेरिटिस, फूड पॉयझनिंग, पोटाचे विकार व हेपेटायटीस यांसारख्या आजारांचा धोका वाढतो.
स्वतःच्या मनाने स्टेरॉइड क्रीम लावण्याची चूक करू नका (Avoid Self-Medication with Steroid Creams)
पावसात भिजल्यानंतर खाज किंवा रॅशेस आल्यास सुरुवातीला कॅलामाइन लोशन किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटी-ॲलर्जिक औषध घेता येऊ शकते. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकलमधून आणून कोणतीही स्टेरॉइड क्रीम लावू नका. यामुळे फंगल इन्फेक्शन तात्पुरते दबले तरी नंतर ते अधिक गंभीर रूप धारण करते. त्रास कायम राहिल्यास त्वरित डर्मेटोलॉजिस्टचा संपर्क साधावा.
संसर्गापासून बचावाचे ५ सोपे उपाय (5 Easy Prevention Tips)
- पावसात भिजल्यानंतर विलंब न करता लगेचच सुके व स्वच्छ कपडे परिधान करा.
- बाहेरून घर पोहोचताच अँटी-बॅक्टेरियल साबणाने अंघोळ करा. केस शॅम्पूने स्वच्छ धुवा.
- त्वचा, विशेषतः त्वचेच्या घड्या (Skin folds) व पायाची बोटे पूर्णपणे सुकी ठेवा.
- ओले टॉवेल, मोजे व अंडरगार्मेंट्स चुकूनही पुन्हा वापरू नका.
- नेहमी ताजे घरगुती अन्न अन् शुद्ध पाण्याचे सेवन करा; तसेच जास्त गोड किंवा प्रोसेस्ड फूड खाणे टाळा.
