हे आहेत बडीशेप खाण्याचे फायदे

आरोग्यासाठी हितकारक

भारतीय अन्नपदार्थांमध्ये बडीशेपला अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वादासाठी अनेक पदार्थांमध्ये वापरली जाणारी बडीशेप जेवणानंतर खाण्याची पद्धत आहे. मात्र जर तुम्ही ती खात नसाल तर त्याचे शरीराला होणारे फायदे समजून घेणे महत्त्वाचे आहे. फायबरचा समावेश असणारा हा पदार्थ अन्नपचन, श्वसनाशी निगडीत तक्रारी अशा अनेक समस्यांसाठी उपयुक्त असतो.

अन्नपचन व गॅसेस तक्रारींवर उपयुक्त

बडीशेपमध्ये असणारे घटक खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. यामुळे बद्धकोष्ठता, गॅसेस यांचे त्रास कमी होण्यास मदत होते.

रक्ताचे शुद्धीकरण होण्यास मदत

बडीशेपमध्ये विशिष्ट प्रकारचे तेल घटक असतात. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास त्याची मदत होते. त्यामुळे रक्तशुद्धीकरणाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने होते.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त

व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. बडीशेपमध्ये याचे प्रमाण जास्त असते. तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठी अमिनो अॅसिड आणि अँटीऑक्सिडंटसही अतिशय आवश्यक असतात. या सर्व घटकांमुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

वजन घटण्यासाठी उपयुक्त

शरीराचा मेटाबॉलिझम वाढविण्यासाठी बडीशेपचा उपयोग होतो. त्यामुळे वजन घटविण्यासाठी हे अतिशय फायदेशीर असते. लठ्ठपणा कमी करुन शरीरयष्टी सुधारण्यासाठी याचा फायदा होतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: What are the amazing health benefits of fennel seeds