Sweet Potatoes Benefits: हिवाळ्याच्या दिवसांत अनेक जण आवर्जून रताळे खातात. रताळे केवळ आरोग्यासाठीच फायदेशीर नाही तर अनेक आजारांपासून आराम देण्यासाठीदेखील फादेशीर आहे. रताळ्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. यात व्हिटॅमिन ए आणि सी फायबर आणि अँटीऑक्सिडेंट्स मुबलक प्रमाणात असून हिवाळ्यात याचे सेवन रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त मानले जाते. ते शरीराला उबदार ठेवते. परंतु, जर तुम्ही सलग एक महिना रताळे खाल्ले तर शरीरावर याचा काय परिणाम होऊ शकतो, हे आपण जाणून घेऊ
थंडीत सलग एक महिना रताळे खाण्याचे फायदे
पचन सुधारते
रताळ्यातील फायबर पचनशक्ती सुधारते, पोट साफ होण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठता कमी करते.
वजन कमी होण्यास मदत
फायबर जास्त असल्याने पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते, त्यामुळे अनावश्यक खाणे कमी होते.
डोळ्यांसाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर
रताळ्यात व्हिटॅमिन-ए (बीटा-कॅरोटीन) भरपूर असते. ते डोळे निरोगी ठेवते आणि त्वचेतील सूज, डाग, पिग्मेंटेशन कमी करण्यात मदत करतात.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते
व्हिटॅमिन सी-ए आणि इतर पोषक घटकांमुळे रोगप्रतिकारकशक्ती मजबूत राहते. यामुळे सर्दी-खोकला, व्हायरल ताप अशा आजारांचा शरीरावर परिणाम होत नाही.
रक्तदाब नियंत्रणात ठेऊन हृदय निरोगी ठेवते
रताळ्यातील पोटॅशियम रक्तदाब संतुलित ठेवायला उपयोगी आहे. हे हृदयासंबंधित आजार निर्माण करण्यापासून रक्षण करते.
स्ट्रेस कमी करतो
रताळ्यात मॅग्नेशियम असल्यामुळे ताण कमी होण्यास मदत होते.
