Health Benefits Of Makhana And Nutmeg With Milk : मखाना आणि जायफळ हे दोन्ही घटक आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहेत. शरीरातील अशक्तपणा दूर करणे, झोप न लागणे, पचनक्रिया बिघडणे किंवा वारंवार सर्दी-खोकला होणे यांसारख्या समस्यांवर अनेकदा आपण स्वयंपाकघरातील मसाले, सुका मेवा आणि औषधी वनस्पतींचा वापर करतो. आयुर्वेदात कमळाच्या बिया (मखाना) आणि जायफळ दोन्ही अत्यंत फायदेशीर मानले गेले आहेत. आरोग्य सुधारणे, शरीर मजबूत करणे आणि चांगली झोप लागणे यांसारख्या अनेक गोष्टींसाठी हे मिश्रण उपयुक्त ठरते. डायटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट नंदिनी यांच्या मते, सलग १४ दिवस रात्री झोपताना दुधामध्ये मखाना आणि जायफळ मिसळून प्यायल्यास शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळतात.
रात्री झोपताना दुधामध्ये मखाना आणि जायफळ मिसळून पिण्याचे मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे
- रक्तदाब आणि हृदय: मखान्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
- पचन आणि झोप: दुधामध्ये मखाना टाकून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते, शरीराला ताकद मिळते आणि गाढ झोप लागण्यास मदत होते.
- अशक्तपणा दूर होतो: मखान्यामध्ये फायबर, प्रथिने आणि अनेक आवश्यक पोषक घटक असतात. तसेच, दुधामध्ये कॅल्शियम, प्रथिने आणि व्हिटॅमिन-डी भरपूर प्रमाणात असते. यामुळे शरीरातील अशक्तपणा दूर होतो.
- सांधेदुखी व निद्रानाश: जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल, तर हे दूध अत्यंत फायदेशीर ठरते. जायफळामुळे मेंदू शांत होतो आणि झोपण्याची गुणवत्ता सुधारते. सलग १४ दिवस हा प्रयोग केल्याने निद्रानाशाच्या (insomnia) समस्येपासून आराम मिळतो.
- मानसिक ताण दूर होतो: दुधामध्ये मखाना आणि जायफळ उकळून प्यायल्याने ताणतणाव आणि मानसिक थकवा दूर होतो. यामध्ये असणारे मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्स मेंदूला आराम देतात.
- प्रतिकारशक्ती वाढते: हे दोन्ही घटक अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असल्यामुळे सलग १४ दिवस हे दूध प्यायल्याने प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि मौसमी आजारांपासून संरक्षण होते.
- हार्मोन्सचे संतुलन: हे दूध पचन सुधारण्यास, हार्मोन्स संतुलित ठेवण्यास आणि मासिक पाळीशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करते.
दूध बनवण्याची पद्धत:
एक ग्लास दूध घ्या. त्यात एक मूठभर भाजलेले मखाने, चिमूटभर जायफळ पावडर आणि चवीनुसार थोडा गूळ टाка. हे मिश्रण चांगले उकळून घ्या आणि रात्री झोपण्यापूर्वी प्या. काही दिवस नियमित असे केल्याने शरीरात सकारात्मक बदल जाणवू शकतात.
