भारतात जवळपास प्रत्येक घरामध्ये केळ हे फळ हमखास असते. केळ हे पुजेसाठीवापरले जाते त्याचबरोबर मुलाना डब्यासाठी देखील केळ उत्तम पर्याय ठरतो. आजारी व्यक्तीलाही आर्वजून केळ भेट दिले जाते जेणे करून त्यांना भरपूर उर्जा मिळेल आणि ते लवकर बरे होतील. रुग्णांसाठी केळ खाणे सोपे आहे. भारतीय योग गुरू, लेखक, शोधकर्ता आणि टीवी पर्सनॅलिटी डॉक्टर हंसा योगेंद्र यांच्यानुसार, तुम्ही प्रत्येक सकाळी दिवसाची सुरुवात एक ग्लास पाणी घेऊन करा आणि त्यानंतर एक मध्येम आकाराचे पिकलेले केळ खा. रोज एक ते दीड महिना केळ खाल्यास पचनक्रिया सुधारेल, उर्जा वाढेल आणि मुड देखील सुधारेल. रोज एक केळ खाणे का आवश्यक आहे ते जाणून घ्या.

सकाळी केळ खाणे फायदेशीर आहे?

आजकाल कित्येक लोक दिवसाची सुरुवात फक्त चहा किंवा कॉफी घेऊन करतात ज्यामुळे सकाळी ११ वाजेपर्यंत शरीरात थकवा,अॅसिडिटी आणि चिडचिडेपणा जाणवतो. हीच सवय दिर्घकाळापर्यंत पचनक्रिया कमकूवत करते. तज्ज्ञांच्या मतानुसार, एका वयस्कर व्यक्तीला रोज २० ते ४० ग्रॅम फायबरची गरज असते पण बहुतांश लोक या प्रमाणापेक्षा कमी फायबर घेतात. एका केळमध्ये साधारण ३ ग्रॅम फायबर असते, त्यात असलेले पॅक्टिकसारखे विरघळणारे फायबर मल मऊ करतात आणि आतड्यांमध्ये चांगले बॅक्टेरिया निर्माण करतात. हे प्रीबायोटिकप्रमाणे काम करते ज्यामुळे गट मायक्रोबायोम संतुलित राहते.

ब्लड प्रेशर आणि हृदयासाठी फायदेशीर ठरते

एक केळमध्ये साधारण ३००-४०० मिलिग्रॅम पोटॅशिअम असते. पुरेसे पोटॅशिअम सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि स्ट्रोक होण्याचा धोका कमी करण्यास मदत करते.

दिवसभर मिळते भरपूर उर्जा

केळीमध्ये नैसर्गिक कर्बोदके आणि फायबर असते जे ग्लुकोज हळू हळू सोडते. त्यामुळे शरीरात अचानक उर्जा मिळते आणि शरीराचा थकवा आणि उर्जा कमी होण्याचा धोका टाळता येतो. विद्यार्थी, ऑफिसला जाणारे लोक आणि गृहिणींसाठी केळहा सकाळी खाल्यास थकवा दूर करण्यास मदत करते. केळ हे व्हिटॅमिन बीसिक्र देखील होते, जे सेरोटोनिन सारखे न्युरोट्रांसमीटरचा निर्माण करण्यास मदत करते. यामुळे मूड आणि मजासंस्था यांच्यात संतलून कायम राहते

केळ खाण्याची योग्य पद्धत

बहुतांश लोकांसाठी उपाशी पोटी केळ खाणे फायदेशीर मानले जाते. हे रात्रभर १२ तासांच्या उपवासानंतर शरीराल उर्जा देते. जर एखाद्याला तीव्रे अॅसिटीडी किंवा संवेदनशीलता पचनाची समस्या आहे तर त्यांच्यासाठी भिजवलेले बदाम किंवा देशी तूपासह केळीचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

कच्चे केळे चांगले की पिकलेले?

कच्च्या केळ्यांमध्ये जास्त प्रतिरोधक स्टार्च असते, जे फायबरसारखे काम करते परंतु पचण्यास थोडे जड असू शकते. ज्यांची पचनशक्ती चांगली असते त्यांनी मर्यादित प्रमाणात पिकलेली केळी खावीत. असे लोक ते कच्चे घेऊ शकतात.

कोणी बाळगली पाहिजे सावधगिरी

डायबिटीज नियत्रणात राहत असेल तर केळ खाताना सजक आणि सतर्क असावे. एक पिकलेल्या केळीमध्ये जवळजवळ १३-१४ ग्रॅम नैसर्गिक शुगर असते जे मधुमेही रुग्णांसाठी साखरेची पातळी वाढण्यास कारणीभूत शकते. नियमितपणे जास्त कच्चे केळी खाल्ल्याने पोटफुगी होऊ शकते. केळी हे एक साधे, सहज उपलब्ध आणि वर्षभर उपलब्ध फळ आहे. त्यात हृदयासाठी पोटॅशियम, नसांसाठी पोषक तत्वे आणि दिवसभर नैसर्गिक ऊर्जा असते. योग्य पोषण आणि संतुलन भूमिका बजावते.

तज्ज्ञांचा सल्ला

तज्ञांच्या मते केळी आणि दूध एकत्र का चांगले नाही? ज्यांना सायनसची समस्या आहे किंवा पचनशक्ती कमकुवत आहे त्यांच्यासाठी केळी आणि दूध एकत्र का खाऊ नये.