Don’t Eat Rice For Month: भारतीय आहारपद्धतीमध्ये भाताला महत्त्वाचे स्थान आहे. देशातील अनेक भागांत विशेषतः महाराष्ट्र, दक्षिण भारत आणि पूर्व भारतात भात हा रोजच्या जेवणाचा अविभाज्य भाग मानला जातो. भात सहज पचणारा, ऊर्जा देणारा आणि विविध डाळी, भाज्या, कडधान्ये व दही यांसोबत खाता येणारा पदार्थ आहे. मात्र, भात किती आणि कोणत्या पदार्थांसोबत खाल्ला जातो, यावर आहाराचे एकूण पोषणमूल्य अवलंबून असते. त्यामुळे भात पूर्णपणे टाळण्यापेक्षा योग्य प्रमाणातील भातासोबत प्रथिने, भाज्या आणि तंतुमयतेनं पदार्थांचा समावेश करणे अधिक संतुलित पर्याय ठरू शकतो.
साधा भात शरीराला कार्बोहायड्रेट्सच्या स्वरूपात ऊर्जा देतो. त्यात फोलेट, काही बी-समूहातील जीवनसत्त्वे आणि खनिजेही आढळतात. पांढरा भात तुलनेने लवकर पचत असल्याने आजारपणातून बरे होत असलेल्या किंवा पचनशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना तो सहज खाता येतो.
एक महिना भात न खाल्ल्यास प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात होणारे बदल वेगवेगळे असू शकतात. भात बंद केल्यानेच वजन कमी होईल किंवा आरोग्यात मोठा बदल होईल, असे नाही. कारण- भाताऐवजी तुम्ही काय खाता आणि एकूण किती उष्मांक घेता यावर त्याचा होणारा परिणाम अवलंबून असतो. भाताच्या जागी पोळी, नाचणी, ज्वारी, बाजरी, ओट्स, कडधान्ये आणि भाज्या यांसारखे संतुलित पर्याय घेतल्यास आहार व्यवस्थित आ रोग्यदायी ठरू शकतो.
एक महिना भात न खाल्ल्यास जाणवू शकणारे बदल
- वजनात बदल: भाताचे प्रमाण कमी झाल्यामुळे एकूण उष्मांक कमी झाले, तर वजन कमी होऊ शकते; मात्र हा परिणाम फक्त भात बंद केल्यामुळे होत नाही.
- पोट हलके वाटू शकते: काहींना जेवणानंतर जडपणा किंवा पोट फुगणे कमी
झाल्यासारखे वाटू शकते, विशेषतः आधी भाताचे मोठे प्रमाण घेत असल्यास.
भूक बदलू शकते : भाताच्या जागी प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थ घेतल्यास पोट अधिक काळ भरलेले राहू शकते. - ऊर्जेत फरक जाणवू शकतो: भात हा कार्बोहायड्रेटचा स्रोत आहे. त्यामुळे पुरेसे कार्बोहायड्रेट न घेताच भात अचानक बंद केल्यास, सुरुवातीला थकवा किंवा अशक्तपणा जाणवू शकतो.
- बद्धकोष्ठता होऊ शकते किंवा कमी होऊ शकते: हे भाताऐवजी तुम्ही कोणते पदार्थ खाता आणि आहारातील फायबर किती आहे यावर अवलंबून असते.
- रक्तातील साखरेवर परिणाम: पांढरा भात मोठ्या प्रमाणात कमी केल्याने काही लोकांमध्ये रक्तातील साखर नियंत्रणात राहू शकते . परंतु, भात पूर्णपणे बंद करणे आवश्यकच आहे, असे नाही.
