Fruits For Liver Health: यकृताचे आरोग्य जपण्यात आहाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. यकृत हा आपल्या शरीरातील सर्वांत महत्वाचा आणि दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा अवयव आहे. तो शरीरासाठी ५०० हून अधिक कार्ये करतो. म्हणूनच यकृत निरोगी आणि सक्रिय राहणे अत्यंत महत्वाचे आहे. पण आजकाल चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि अस्वास्थ्यकर जीवनशैली यांमुळे यकृतावर चरबी जमा होते, ज्यामुळे यकृताची कार्यक्षमता कमी होते आणि जर त्याचे कार्य बिघडले, तर त्यामुळे शरीराच्या जवळजवळ प्रत्येक भागावर त्याचा परिणाम होतो. ‘फॅटी लिव्हर’ची समस्या वाढवण्यास कारणीभूत ठरू शकणारे अनेक पदार्थ असले तरी असेही काही पदार्थ आहेत, जे यकृतातील विषारी घटक (toxins) बाहेर टाकण्यास मदत करतात. तुम्हीही या फळांचा तुमच्या आहारात समावेश करू शकता.
सफरचंद
सफरचंदात ‘पेक्टिन’ नावाचे फायबर असते, जे यकृत (लिव्हर) निरोगी ठेवण्यास मदत करते. फायबरचा पुरेपूर लाभ मिळवण्यासाठी सफरचंद न सोलताच खावे.
किवी
जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, तर दिवसातून दोन किवी नक्की खा. किवीसुद्धा सालीसकट खावे. यकृताच्या आरोग्यासाठी किवी हे एक फायदेशीर फळ आहे.
रास्पबेरीज
हे फळ तंतुमय पदार्थांनी (फायबरने) समृद्ध असते. रास्पबेरीज ओटमील किंवा ग्रीक योगर्टमध्ये मिसळून खाता येतात.
ब्ल्यूबेरीज
ब्ल्यूबेरीज ताज्या किंवा गोठवलेल्या (फ्रोजन) स्वरूपात खाता येतात. त्या यकृतासाठी (लिव्हरसाठी) फायदेशीर असतात आणि त्यातील उच्च अँटीऑक्सिडंट्समुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
पेर (नाशपाती)
आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असलेले पेर म्हणजेच नाशपाती हे फळ तुम्ही दररोज खाऊ शकता. त्यातून जास्तीत जास्त तंतुमय पदार्थ (फायबर) मिळवण्यासाठी, ते सालीसकट खावे.
ॲव्होकॅडो
डॉक्टरांच्या मते, तांत्रिकदृष्ट्या ॲव्होकॅडो हे एक फळ आहे. त्यात भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ (फायबर) आणि आरोग्यदायी फॅट्स (स्निग्ध पदार्थ) असतात.
डाळिंब
‘फॅटी लिव्हर’चा त्रास असलेल्या व्यक्ती डाळिंबाच्या बियांचे सेवन करू शकतात. या बिया दह्यासोबत मिसळून किंवा सॅलडमध्ये घालून खाता येतात.
