Cabbage health benefits: कोबी ही एक अशी भाजी आहे, जी अनेकदा सूप, सॅलड आणि चायनीज पदार्थांमध्ये वापरली जाते. लोक अनेकदा तिचा वापर साईड डिश म्हणून करतात. बहुतेक लोकांना कोबी खायला आवडते; पण ते त्याकडे नाक मुरडतात. तुम्हाला माहीत आहे का की, तुम्ही दुर्लक्ष करत असलेली ही भाजी पोषक तत्त्वांचा खजिना आहे? या भाजीमध्ये असे गुणधर्म आहेत, जे तुमचे संपूर्ण आरोग्य सुधारू शकतात?
कोबी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि अनेक जुनाट आजारांचा धोका कमी होतो. चांगल्या आरोग्यासाठी कोबी खाणे अत्यंत फायदेशीर आहे. आठवड्यातून एकदा पोषक तत्त्वांनी समृद्ध कोबी खाण्याचे शरीरावर होणारे परिणाम आणि ही भाजी आरोग्यासाठी किती प्रमाणात फायदेशीर आहे ते जाणून घेऊया.
पचनक्रिया निरोगी राहते
हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल्समधील वरिष्ठ सल्लागार फिजिशियन डॉ. दिलीप गुडे स्पष्ट करतात की, आहारात अर्धा ते पाऊण कप शिजवलेला कोबी किंवा दीड कप कच्चा कोबी समाविष्ट केल्याने पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. कोबीच्या सेवनाने आतड्यातील चांगल्या जीवाणूंना पोषण मिळते, ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. कोबी पोटापासून ते आतड्यांपर्यंत उत्तम आरोग्याला चालना देते. ही भाजी आतड्यांचे अस्तर निरोगी ठेवण्यासाठी उत्कृष्ट आहे. कोबीच्या सेवनाने आतड्यातील चांगल्या जीवाणूंची संख्या वाढते.
वजन नियंत्रणात राहते
वेबएमडीनुसार, कोबीमधील फायबर तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटण्यास आणि भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करते. कोबीचे सेवन केल्याने खाण्याची तीव्र इच्छा कमी होण्यास आणि अस्वास्थ्यकर पदार्थ टाळण्यास मदत होऊ शकते. कोबीचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत होऊ शकते.
कोलेस्ट्रॉल नियंत्रित केले जाते
कोबीमध्ये अँथोसायनिन नावाचा एक शक्तिशाली घटक असतो. त्याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत होते. हृदयविकार टाळण्यासाठी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कोबी खा.
बद्धकोष्ठतेवर उपचार केला जातो
आठवड्यातून एकदा किंवा दोनदा फायबरयुक्त कोबी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेवर उपचार होण्यास मदत होऊ शकते. कोबीमधील विशिष्ट प्रकारचे फायबर प्री-बायोटिक्स म्हणून काम करतात, जे आतड्यांचे आरोग्य सुधारतात आणि बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यास मदत करतात.
रक्तातील साखर नियंत्रणात राहते
फायबरने भरपूर असलेली कोबी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढण्यास प्रतिबंध होतो. ज्या लोकांना उच्च रक्तशर्करेचा त्रास आहे, त्यांनी आपल्या आहारात या भाजीचा समावेश करावा.
