Health Benefits of Eating Raw Garlic Everyday : लसूण हा आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. जेवणात लसणाचा वापर केल्याने जेवणाला एक वेगळी चव येते. त्यामुळे फार पूर्वीपासूनच आहारात त्याचा वापर केला जात आहे. पण, चव वाढविण्याव्यतिरिक्त त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. आरोग्याच्या विविध समस्यांवर नैसर्गिक उपाय म्हणून लसणाचा वापर केला जातो.

आपल्या रोजच्या आहारात लसणाच्या एका पाकळीचा समावेश केल्याने केवळ तुमची रोगप्रतिकार शक्तीच वाढत नाही, तर हृदयाचे आरोग्यही सुधारते. त्याशिवायही याचे इतर अनेक फायदे आहेत. रोज सकाळी उपाशीपोटी लसणाची एक पाकळी खाण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया.

लसणात एक ॲलिसिन नावाचे एक संयुग असते, जे विविध सूक्ष्मजीवविरोधी फायद्यांसाठी ओळखले जाते. लसणाच्या एका पाकळीमध्ये सुमारे ३४% ॲलिसिन असते. लसणाच्या ताज्या पाकळ्या ठेचल्यावर त्यातून मिळणारे ॲलिसिन हे संयुग शक्तिशाली अँटीपॅरासिटिक (parasite-fighting) आणि अँटीमायक्रोबियल घटक प्रदान करतात. हे घटक घातक जीवाणू, विषाणू आणि बुरशीजन्य संसर्गांशी, तसेच विविध बाह्य आजारांशी लढून शरीराचे संरक्षण करण्यासाठी मदत करतात.

Award Banner

रोज लसणाची एक पाकळी खाण्याचे ‘हे’ आहेत जबरदस्त फायदे

१) हृदयाचे आरोग्य सुधारते

लसूण रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल कमी करून, हृदयरोगाचा धोका कमी करतो. तो शरीरातील रक्ताभिसरण आणि प्रवाह सुधारतो, ज्यामुळे धमन्यांमध्ये प्लाक जमा होण्यास प्रतिबंध होतो. तसेच, तो दाह कमी करतो आणि हृदयाच्या कार्याला चालना देऊन, हृदयाचे आरोग्य सुधारतो.

२) रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करा

मधुमेहींसाठी लसूण एक वरदान आहे. त्याचे दररोज सेवन केल्याने इन्सुलिनची संवेदनशीलता आणि रोगप्रतिकार शक्ती सुधारते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते . त्यामुळे मधुमेह असलेल्या किंवा मधुमेह होण्याचा उच्च धोका असलेल्या लोकांसाठी हा उपाय फायदेशीर ठरतो.

३) पचनक्रिया सुधारते

रोज लसणाची एक पाकळी खाल्ल्याने तुमची पचनक्रिया सुधारू शकते. तसेच ही पाकळी खाल्ल्याने पाचक एंझाइम्सचे उत्पादन वाढते. त्यामुळे आतड्यातील उपयुक्त जीवाणूंना चालना मिळते, जे पचन आणि इतर प्रक्रियांमध्ये मदत करतात. एकंदरीत, लसूण उत्तम पचनास मदत करतो आणि पोट फुगणे व तीव्र बद्धकोष्ठता यांसारख्या पचनाच्या समस्या टाळण्यास मदत करू शकतो.

४) रोगप्रतिकार शक्ती वाढते

जर तुम्हाला तुमच्या कमकुवत प्रतिकारशक्तीळेमु चिंता वाटत असेल, तर लसूण हा त्यावर रामबाण उपाय आहे. त्याचे सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती नैसर्गिकरीत्या वाढू शकते. लसणामधील ॲलिसिनमध्ये हानिकारक जीवाणू, विषाणू आणि बुरशी यांचा नाश करणारे गुणधर्म असतात, जे शरीराची रोगप्रतिकार शक्ती सुधारतात. तसेच ते सर्दी, फ्ल्यू आणि श्वसनाच्या आजारांशी लढण्यासही मदत करतात.

५) मेंदूच्या आरोग्यास मिळते चालना

लसणामध्ये असलेले भरपूर अँटिऑक्सिडंट्स आपल्या शरीराला वाढत्या वयामुळे होणाऱ्या बौद्धिक क्षीणतेशी लढण्यास मदत करू शकतात. त्यामुळे अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश यांसारख्या मेंदूच्या इतर आजारांचा धोकादेखील कमी होऊ शकतो किंवा त्यांची वाढ मंदावू शकते.