Winter Health Almonds Benefits : शरीर निरोगी ठेवण्यासाठी रोज बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. विशेषतः हिवाळ्यात बदाम खाल्ल्याने शरीर ताजेतवाने राहते आणि भरपूर पोषण मिळते. रोज एक मुठभर बदाम खाल्ल्याने शरीराला खूप फायदे मिळतात. तुम्ही आहारात वेगवेगळ्या पद्धतीने बदाम समाविष्ट करू शकता. त्याचा कुरकुरीतपणा पोषक तत्वांनी परिपूर्ण असतो. नाश्ता करताना किंवा प्रवासात बॅगेच ठेवण्यासाठी बदाम हा एक उत्तम पर्याय आहे, जो तुम्हाला हेल्दी फॅट्स, जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन्स) आणि भरपूर ऊर्जा देतो.
गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून सांगितले आहे की, नियमित बदाम खाल्ल्याने आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो. त्यांनी आरोग्याशी संबंधित अनेक असे फायदे शेअर केले आहेत, ज्याबद्दल बहुधा अनेकांना माहिती नसेल.
दररोज बदाम खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो?
डॉ. सौरभ सेठी यांच्या मते, दररोज एक मुठ बदाम खाल्ल्याने मिळणारे प्रमुख फायदे खालीलप्रमाणे आहेत:
१) हृदयासाठी फायदेशीर: एका मेटा-विश्लेषणात असे दिसून आले आहे कि, बदाम एलडीएल (LDL) म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल सुमारे ५ मिलीग्राम प्रति डेसीलिटरपर्यंत कमी करतात.
२) पोटाच्या आरोग्यासाठी उत्तम: फक्त एक मूठ बदामात (म्हणजेच २३ बदाम) सुमारे ४ ग्रॅम फायबर देतात, जे पोटाच्या आरोग्यास मदत करतात.
३) रक्तातील साखरेवर नियंत्रण: कार्बोहायड्रेट्ससह बदाम खाल्ल्याने जेवणानंतर रक्तातील साखर (ग्लूकोज स्पाइक्स) वाढण्यापासून रोखण्यास मदत होते.
४) भूक नियंत्रित राहते: एका मुठी बडाममध्ये ६ ग्रॅम प्रथिने (प्रोटिन) आणि हेल्दी फॅट्स असतात, ज्यामुळे तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.
५) त्वचेवर चमक येते: एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, २४ आठवड्यांनंतर चेहऱ्यावरील सुरकुत्यांचे प्रमाण १६% पर्यंत कमी झाले.
बदाम पाण्यात भिजवून खाणे फायदेशीर
हिवाळ्यात तुम्ही बदाम भाजून (रोस्ट करून) सुद्धा खाऊ शकता. संध्याकाळच्या चहासह खाण्यासाठी बदाम हा एक चांगला पर्याय आहे. आपल्या रोजच्या आहारात याचा नक्की समावेश करा.
