Soaked Raisins, Peanuts Benefits For Health : मनुका आणि शेंगदाणे हे दोन सुकामेवा आहेत, जे लोक अनेकदा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये खातात. पण, तुम्हाला माहीत आहे का की हे दोन्ही सुकामेवा भिजवल्यास त्यातील पौष्टिक घटक अनेक पटींनी वाढतो. सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मनुका आणि शेंगदाणे खाल्ल्याने आरोग्याला अनेक उत्तम फायदे मिळतात. आयुर्वेदातही रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके आणि शेंगदाणे खाण्याचे फायदे सांगितले आहेत. अशक्तपणा आणि सुस्ती दूर करण्यासाठी हे खूप प्रभावी आहे. चला तर मग जाणून घेऊया याचे नेमके फायदे काय आहेत आणि त्याचे सेवन करण्याची योग्य पद्धत कोणती आहे.

मनुका आणि शेंगदाणे पोषक तत्त्वांचे मुख्य स्त्रोत ( Surprising Benefits of Eating Soaked Raisins and Peanuts Every Morning)

मनुका आणि शेंगदाण्यांचे मिश्रण पोषक तत्त्वांचा खजिना मानले जाते. हे दोन्ही पदार्थ प्रथिने, हेल्दी फॅट, फायबर आणि तुमचे आरोग्य सुधारणाऱ्या अनेक आवश्यक जीवनसत्त्वे व खनिजांचा चांगला स्रोत आहे.

रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके आणि शेंगदाणे खाण्याचे फायदे (Benefits of soaked raisins and peanuts)

१) पचनक्रिया सुधारते
भिजवलेले मनुके आणि शेंगदाणे यांचे मिश्रण पचनासाठी एक उत्तम नैसर्गिक उपाय मानला जातो. हे मिश्रण बद्धकोष्ठतेपासून आराम देण्यासह आतडे स्वच्छ करण्यास आणि ऊर्जा पातळी वाढविण्यात मदत करते.

Award Banner

२) शरीराला त्वरित ऊर्जा पुरवते
सकाळी भिजवलेले मनुके नॅच्युरल ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचा उत्तम स्रोत आहेत, जे शरीरास त्वरित ऊर्जा पुरवतात, तर शेंगदाण्यांमध्ये असलेले फॅट शरीराला हळूहळू ऊर्जा पुरवते, ज्यामुळे स्टॅमिना वाढवण्यासाठी आणि थकवा कमी करण्यासाठी हे उत्तम आहे.

३) हृदयाचे आरोग्य सुधारते
भिजवलेले मनुके आणि शेंगदाणे हाय पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स घटक असतात, जे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

त्याचे सेवन कसे करावे? (Right Way to Eat)

मूठभर शेंगदाणे आणि ६-१० काळे मनुके एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करा. मनुके भिजवलेले पाणी तुम्ही पिऊही शकता, कारण त्यात विरघळलेली पोषक तत्त्वे असतात. सकाळी कॅफीनयुक्त पेयांऐवजी हे पदार्थ खाल्ल्यास शरीरास खूप फायदे मिळतील.