मीठ हा आपल्या अन्नाचा एक महत्त्वाचा भाग आहे जो आपल्या जेवणाची चव वाढवतो. जेवणात एकवेळ मीठ कमी असलेलं चालतं, पण मीठाशिवाय खाण्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. मिठाच्या सेवनाने जेवणाची चव वाढते, तसेच शरीर निरोगी राहते. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब, तसेच किडनीचा त्रास होऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : तुमच्या रेल्वे तिकिटावर ‘दुसरी व्यक्ती’ही करू शकते प्रवास! जाणून घ्या रेल्वेचे महत्त्वाचे नियम आणि प्रक्रिया

जास्त मीठ खाल्ल्याने किडनीला शरीरातील द्रव काढून टाकण्यास त्रास होतो आणि किडनीच्या समस्या निर्माण होतात. जेवणात मिठाचे प्रमाण मर्यादित असणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया चांगल्या आरोग्यासाठी मीठ किती खावे. जास्त मीठ खाल्ल्याने कोणते दुष्परिणाम होतात?

आणखी वाचा : “जो सीन माझ्या कारर्किदीतला…”, ‘रानबाजार’ सीरिजमधील भूमिकेविषयी प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

मीठ किती खावे हे आरोग्यासाठी महत्त्वाचे

WHO च्या मते, आपण दररोज ५ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात सोडियम आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त होते, ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. ‘डब्ल्यूएचओ’च्या मते, लोक दररोज ९ ते १२ ग्रॅम मीठ खातात, जे आरोग्यास हानी पोहोचवते.

आणखी वाचा : “असा चित्रपट करताना लाज वाटली पाहिजे…”, ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटावरून केआरकेने केली अक्षय कुमारवर टीका

रक्तदाब वाढू शकतो

जेवणात जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो. रक्तदाबामुळे अनेक आजारांचा धोका वाढू शकतो. उच्च रक्तदाबामुळे दृष्टी कमी होऊ शकते. जेवणात मर्यादित मीठ सेवन केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते, जेवणाची चव सुंदर राहते, तसेच अनेक आजारांचा धोका कमी होतो.

आणखी वाचा : ‘रानबाजार’मुळे प्राजक्ता-तेजस्विनीला ट्रोल करणाऱ्यांना सचिन खेडेकरांनी दिलं उत्तर, म्हणाले “मराठी प्रेक्षक…”

लठ्ठपणा वाढतो

जेवणात जास्त मीठ घेतल्याने लठ्ठपणा वाढतो. मिठाच्या अतिसेवनाने शरीरातील कॅलरीज वाढतात, ज्यामुळे शरीरातील चरबी वाढते. मिठाचे जास्त सेवन केल्याने देखील गॅस्ट्रिक ट्यूमर होऊ शकतो. लठ्ठपणा वाढत असेल तर मीठावर नियंत्रण ठेवा.

आणखी वाचा : “जॉनी डेपला ११६ कोटी रुपये नुकसान भरपाई देऊ शकत नाही…”, अँबर हर्डच्या वकिलाचे वक्तव्य चर्चेत

किडनीच्या आरोग्यावर परिणाम

जास्त मीठ खाल्ल्याने किडनीच्या आरोग्यावरही परिणाम होतो. जेव्हा जास्त सोडियम शरीरात जाते, तेव्हा मूत्रपिंडाला ते पचवण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतात.

आणखी वाचा : चित्रपटासाठी १०० कोटी मानधन घेणारा अक्षय एका जाहिरातीसाठी किती पैसे घेतो माहितये का?

फुगलेला चेहरा

जास्त मीठ खाल्ल्याने चेहऱ्यावर सूज येऊ लागते. अनेक रिसर्चमध्ये हे समोर आले आहे की मिठाच्या अतिसेवनाने चेहरा फुगलेला दिसतो.

आणखी वाचा : …तर शाहरुखच्या ‘Jawan’ मध्ये असती समांथा, पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्यमुळे दिला होता नकार

हात-पायांची सूज वाढू शकते: मिठाच्या अतिवापराने हात-पायांवर सूज येऊ शकते.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What happens if you eat too much salt dcp
First published on: 04-06-2022 at 21:12 IST