How To Consume Ghee with Water: तूप फक्त जेवणाची चव वाढवत नाही, तर आरोग्यासाठीदेखील अत्यंत फायदेशीर मानले जाते. बरेच लोक पोळी, डाळ आणि खिचडीबरोबर ते खातात. तुपामध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, के यांसह फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि आयर्नसारखे पोषक घटक आढळतात, जे शरीरासाठी लाभदायक असतात. त्याचे नियमित सेवन केल्याने पचनतंत्र मजबूत राहते आणि हाडेही निरोगी राहतात. पण तुम्हाला माहीत आहे का, की जर सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात तूप मिसळून प्यायले तर त्याचे अद्भुत फायदे मिळतात. हा उपाय कोणत्याही औषधापेक्षा कमी नाही.
कोमट पाण्यासह तुपाचे सेवन
पचनशक्ती सुधारते
तूप अग्नी संतुलित ठेवते आणि कोमट पाणी पचनमार्ग स्वच्छ करते. दोन्ही मिळून पचन मजबूत होते. शिवाय आपल्या अन्नाचे पचनही सुरळीत होते.
बद्धकोष्ठता कमी होते
तुपातील गुणधर्मामुळे आतड्यांमध्ये गती सुधारते. ते सकाळी प्यायल्यास पोट साफ होण्यास मदत होते. कोमट पाण्यात तूप टाकून प्यायल्याने अॅसिडीटी दूर होण्यास आणि कफ कमी होण्यास मदत होते.
त्वचा चमकदार आणि मऊ होते
तुपातील हेल्दी फॅट त्वचेला आतून पोषण देतात, ज्यामुळे शरीर आतून डिटॉक्स होऊन शरीरातील सर्व विषारी घटक बाहेर काढतात. परिणामी चेहऱ्यावरील डाग, कोरडेपणा कमी होतो.
वजन कमी करण्यास उपयोगी
तूप मेटाबॉलिजम वाढवते आणि सकाळी पोट हलके होते. याच्या सेवनाने भूक लवकर लागत नाही, त्यामुळे वजनही आपोआप कमी होते.
हार्मोन संतुलनासाठी फायदेशीर
तुपातील हेल्दी फॅट हार्मोन्सची कार्यक्षमता सुधारतात, विशेषतः महिलांसाठी फायदेशीर आहे.
वात शांत करण्यासाठी तूप उत्तम मानले जाते. यामुळे सांधे कडक होणे, कोरडी त्वचा, चिडचिड कमी होते.
कोमट पाहण्यासह तुपाचे सेवन कसे करावे?
- १ ग्लास कोमट पाणी
- १/२ ते १ चमचा देशी तूप
- चांगले मिक्स करून रिकाम्या पोटी प्या
- रोज किंवा आठवड्यात ४-५ वेळा पुरेसे आहे.
