भारतातील जवळपास प्रत्येक घरामध्ये गरमा गरम बेसनाची पोळी सर्वोत्तम, आरामदायी आणि नेहमीचा नाश्ता म्हणून आवडीने खाल्ला जातो. बेसन पोळी बनवायला अत्यंत सोपी आहे, झटपट तयार होते आणि पोटही भरते. याशिवाय त्यात थोडासा बदल करून आरोग्यदायी देखील बनवता येते म्हणून त्याला आरोग्यदायी नाश्ता म्हटले जाते.
हे रोजच्या धावपळीच्या आधुनिक जीवनशैलीत झटपट तयार होणारी पौष्टिक बेसन पोळी हा नाश्त्यासाठी उत्तम पर्याय ठरतो. पण बेसन पोळी खरंच आरोग्यदायी आहे का? याबाबत तज्ज्ञ काय सांगतात हे जाणून घेऊ या.
न्यूट्रिशनिस्ट आणि न्यूट्रेसी लाइफस्टाइलच्या संस्थापक आणि सीईओ डॉ. रोहिणी पाटील यांच्या मते, बेसन पोळी खाऊन सकाळची सुरुवात केल्याने तुमचे पचन, ऊर्जा पातळी, स्नायू आणि अगदी तुमचा मध्यान्हाचा मूड शांतपणे बदलू शकतो.
“बेसनाची पोळी हा भारतातील दुर्मिळ नाश्त्याच्या पदार्थांपैकी एक आहे जो केवळ सोपा आणि आरामदायीच नाही तर खरोखर पौष्टिक देखील आहे. बेसन नैसर्गिकरित्या प्रोटीन, फायबर, लोह, मॅग्नेशियम आणि बी व्हिटामिन्सने समृद्ध असते, ज्यामुळे ही साधारण कार्बयुक्त नाश्त्यापेक्षा खूप अधिक पोषक असते.”असे डॉ. पाटील म्हणतात.
पाटील सांगतात की,तुमच्या शरीरात बेसन कसे पचते यात खरी गंमत आहे. ऊर्जा हळूहळू सोडत असल्यामुळे, हे तुमचे ऊर्जा स्तर दीर्घकाळ स्थिर ठेवते.” पण मग काय होते जेव्हा तुम्ही रोज नाश्त्यासाठी बेसनची पोळी खायला सुरुवात करता?
रोज नाश्त्यासाठी बेसन पोळी खाल्यास काय होईल?(What daily besan cheela does to your body)
डॉ. पाटील स्पष्ट करतात की,“जर तुम्ही रोज सकाळी बेसन पोळी खाल्ली, तर तुमचे शरीर विशिष्ट आणि अंदाज लावता येणाऱ्या पद्धतीने प्रतिसाद देऊ लागते. प्रोटीन स्नायूंना दुरुस्त करण्यात मदत करते आणि तुमचे पोट जास्त काळ भरलेले वाटते. ‘हे दुपारी जेवण्यापूर्वी अनावश्यक लालसा(काहीतरी खाण्याची इच्छा) कमी करते.”
“रोज नाश्त्यामध्ये बेसन पोळी खाल्ली तर पचन प्रक्रियाही सुधारते. बेसनातील फायबर आतड्याची हालचाल नियमित करण्यास मदत करते आणि आरोग्यदायी आतडी बॅक्टेरियाला पोषण देते. तसेच, बेसनची ग्लायसेमिक प्रतिक्रिया कमी असल्यामुळे रक्तातील साखर स्थिर राहते, आणि ती अचानक वाढत किंवा घटत नाही. ‘बेसनातील प्रोटीन काहीतरी खाण्याची इच्छा(लालसा) कमी करते आणि स्नायू दुरुस्तीला ऊर्जा प्रदान करते, त्यामुळे सकाळपासून दुपारी जेवणापर्यंत पोटभर भरलेले वाटते,’ असे आहारतज्ज्ञ स्पष्ट करते.”
बेसन पोळी नाश्त्यामध्ये खाण्याचे फायदे
डॉ. पाटील यांच्या मते, बेसनाची पोळी रोज नाश्त्यासाठी घेण्याचे अनेक फायदे आहेत:
- दीर्घकाळ पोटभरल्यासारखे वाटणे आणि वजन नियंत्रण: शक्तिशाली प्रोटीन–फायबर संयोजन तासंतास संतुष्ट ठेवते आणि जंक फूडची खाण्याची इच्छा कमी करते.
- स्नायूंचे स्वास्थ्य आणि चयापचय समर्थन: प्रोटीन-समृद्ध नाश्ता लीन स्नायूंचे संरक्षण करतो आणि चयापचय दर सक्रिय ठेवतो.
- सूक्ष्म पोषक तत्त्वांचे समर्थन: बेसन नैसर्गिकरित्या लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि बी व्हिटामिन्सने समृद्द असते—हे ऊर्जा, रोगप्रतिकारक शक्ती आणि एकूण आरोग्यासाठी आवश्यक आहेत.
- प्रोटीन समृद्धी: बेसनच्या पोळीत पनीर किंवा टोफू घालल्यास प्रोटीनचे प्रमाण अधिक वाढते.”
“खरं तर, बेसन पोळी व्यावहारिक, कमी खर्चाचा आणि तुमच्या दैनंदिन प्रथिनांची गरज पूर्ण करण्यासाठी प्रभावी आहे. “जर बेसन पोळी थोड्या प्रमाणात तेल आणि काही वेगवेगळ्या भाज्या वापरून तयार केली तर तो एक आरोग्यदायी जेवणाचा पर्याय तयार करतो जो तुमची पचनसंस्था सुधारण्यास मदत करतो, तुमचा चयापचय दर वाढवतो आणि समाधानाची भावना निर्माण करतो. ज्यांना निरोगी नाश्ता खायचा आहे परंतु जेवण तयार करण्यात जास्त वेळ घालवायचा नाही त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.” असे डॉ. पाटील सांगतात.
बेसन पोळी आणखी पौष्टिक कसे बनवायचे (How to make it more nutritious)
जर बेसन पोळी तुमचा रोजचा नाश्ता असेल, तर डॉ. पाटील काही सुधारणा सुचवतात:
- अधिक भाज्या घाला: पालक, सिमला मिरची, टोमॅटो, कांदे, गाजर किंवा किसलेले पनीर फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स वाढवते.
- कमी तेल आणि मीठ वापरा: नॉन-स्टिक पॅन किंवा ऑइल स्प्रे कॅलरीज आणि सोडियम नियंत्रित ठेवतो.
- प्रथिने वाढवा: दह्याबरोबर खा किंवा पनीर किंवा टोफू पिठात मिसळा.
- फायबर जोजा: एक लहान सॅलड, फळे किंवा चटणी पचन आणि तृप्तता वाढवते.
“दिवसाच्या शेवटी पनीर, दही किंवा डाळबरोबर बेसन पोळी खाल्यास ते वनस्पतीयुक्त प्रथिनांचा एक विश्वासार्ह आणि पचण्याजोगा स्रोत बनते आणि वजन व्यवस्थापन, स्नायूंचे आरोग्य आणि संतुलित पोषण यासाठी आदर्श,” डॉ. पाटील सांगतात.
अशाप्रकारे, बेसन पोळीचा नेहमीचा नाश्ता हा एक आरोग्यदायी जेवणाचा पर्याय आहे ज्यावर तुम्ही अवलंबून राहू शकता, त्यात आणखी काही भर घालता येतील.
