Drinking Chai on an Empty Stomach Impact on Digestion : नवीन दिवसाची सुरुवात गरम चहासह करणे अनेकांसाठी रोजची सवय आहे. परंतु रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास पचनसंस्था, आम्ल पातळी आणि ऊर्जा पातळीवर हळूहळू परिणाम होऊ शकतो. बंगळुरू अ‍ॅस्टर आर. व्ही. हॉस्पिटल, वरिष्ठ क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट, अदिती प्रसाद आपटे दी इंडियन एक्स्प्रसेला माहिती देताना सांगतात, “चहात टॅनिन, कॅफीन, दूध, साखर आणि मसाल्यांचा समावेश असतो. त्यामुळे रिकाम्या पोटी चहा घेतो तेव्हा पोटात अन्न नसल्यानं हा उत्तेजनाचा परिणाम जास्त तीव्र होतो.”

आम्ल वाढणे आणि पोटात त्रास (Increased Acidity and Stomach Irritation)

सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास आम्लता वाढू शकते. ग्लेनइगल्स हॉस्पिटल वरिष्ठ कंसल्टंट गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट डॉ. शंकर झणवर(Dr Shankar Zanwar) सांगतात, “टॅनिनमुळे आम्ल उत्पादन वाढते, ज्यामुळे पोटाचे अस्तराचे नुकसान होते. यामुळे छातीत जळजळ, मळमळ, पोट फुगणे किंवा वरच्या पोटात जडपणा जाणवू शकतो.” आधीपासून आम्ल -पित्ताचा त्रास किंवा गॅस्ट्रायटिस (गॅस किंवा पोटाचे विकार) असलेल्या लोकांमध्ये ही लक्षणं वारंवार दिसू लागतात.

पोट फुगणे, पोटातील अस्वस्थता आणि बद्धकोष्ठता (Bloating, Discomfort, and Bowel Changes)

चहामध्ये दूध असल्याने काही लोकांमध्ये पचन मंदावते, ज्यामुळे गॅस किंवा जडपणाचे भान येऊ शकते. अदिती आपटे पुढे सांगतात, “कॅफीन पचनसंस्था आणि न्युरो सिस्टम दोन्हीला उत्तेजन देते, ज्यामुळे काही लोकांना सकाळी अचानक शौचाची तातडीने लागू शकते. सुरुवातीला हे पचनासाठी ‘किकस्टार्ट’ वाटू शकते, पण रिकाम्या पोटी दीर्घकाळ हा सवयीचा परिणाम गटावर संवेदनशीलता वाढवू शकतो.”

Award Banner

एनर्जी स्पाइक्स, क्रॅश आणि पोषक तत्वांचा शोषण (Energy Spikes, Crashes, and Nutrient Absorption)

सकाळी चहा प्यायल्यानंतर थोडा ऊर्जा बूस्ट मिळतो, पण ते दीर्घकाळ टिकत नाही. कॅफीनमुळे अल्पकालीन जागरूकता मिळते, परंतु नंतर थकवा, तणाव किंवा चक्कर येऊ शकते.

ब्रेकफास्ट न करता चहा प्यायल्यास नैसर्गिक भूक संवेदना कमी होतात आणि अनियमित जेवणाची सवय तयार होऊ शकते,” असे अदिती आपटे सांगतात.

साखर घालल्यास रक्तातील साखरेची पातळी पटकन वाढते आणि नंतर पटकन घसरतेही, ज्यामुळे अचानक थकवा जाणवतो. चहामध्ये असलेले टॅनिन लोहचे शोषण कमी करते, त्यामुळे अल्पकालीन लोहच्या कमतरतेची समस्या असलेल्या लोकांसाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

चहा सोडण्याची गरज नाही, फक्त वेळ बदला

सकाळी चहा पूर्णपणे सोडण्याची गरज नाही. त्याऐवजी चहा नंतर किंवा काही अन्नाबरोबर प्यायल्यास पोटाला जास्त त्रास होत नाही आणि पचनावर सौम्य परिणाम होतो.