Why eating whole eggs matter : परवडणारा, चविष्ट आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण अंड त्यांच्यातील उच्च प्रथिनांच्या प्रमाणामुळे ओळखली जातात. स्नायूंच्या वाढीस मदत करतात, तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे ठेवतात. त्यामुळे रोजच्या जेवणात त्यांचा समावेश करणे सुद्धा सोपे जाते. पण, तरीही एक प्रश्न उपस्थित होतो. चयापचय क्रियेवर परिणाम न होता तुम्ही दररोज अंडी खाऊ शकता का? तर याचबद्दल आपण बातमीतून जाणून घेऊयात…

एम्स, हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड येथे प्रशिक्षित, कॅलिफोर्नियास्थित गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट (पचनसंस्थेचे तज्ञ) डॉक्टर सौरभ सेठी यांनी, सलग १४ दिवस दररोज अंडी खाल्ल्यास काय होईल याबद्दल सविस्तरपणे सांगून या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे…

तुम्ही सलग १४ दिवस रोज अंडी खाल्ली तर काय होईल?

१. मेंदूच्या कार्याला चालना

ॲसिटिलकोलीन हा एक न्यूरोट्रान्समीटर आहे जो स्मरणशक्ती आणि एकाग्रतेसाठी महत्त्वाचा असतो आणि कोलीन अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात असते. जे मेंदूच्या आरोग्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते, ॲसिटिलकोलीन तयार करण्यास मदत करते. त्यामुळे त्याचे नियमित सेवन केल्यास कालांतराने संज्ञानात्मक कार्याला मदत होऊ शकते.

२. कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारते

बऱ्याच लोकांमध्ये, अंडी खाल्ल्याने HDL (हाय-डेन्सिटी लायपोप्रोटीन), म्हणजेच चांगले कोलेस्ट्रॉल, वाढू शकते. कोलेस्ट्रॉलमुळे अंडी खाण्याबद्दल अनेकदा संकोच असतो. पण ही चिंता नेहमीच अचूक नसते. नियमितपणे अंडी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारू सुद्धा शकते.

३. डोळ्यांच्या आरोग्याला आधार

अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये ल्युटीन आणि झियाझॅन्थिन असतात. हे असे अँटिऑक्सिडंट्स आहेत, जे उच्च दर्जाची ऊर्जा असलेला निळा प्रकाश फिल्टर करण्यास आणि डोळ्यांच्या आरोग्यास मदत करतात. अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये महत्त्वाचे अँटिऑक्सिडंट्स असतात, जे डोळ्यांचे संरक्षण करण्यास आणि दीर्घकाळ दृष्टीचे चांगली ठेवण्यास मदत करतात.

४. त्वचा, केस, नखांचा फायदा

अंड्यांमध्ये सल्फरयुक्त अमिनो ॲसिड भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराला केराटिन तयार करण्यास मदत करतात. अंड्यांमध्ये सल्फरयुक्त अमिनो ॲसिड देखील असतात. जे शरीराला केराटिन तयार करण्यास मदत करतात, जे निरोगी त्वचा, केस, नखे राखण्यासाठी आवश्यक असलेले एक प्रथिन आहे.

पण, अंडी खाण्याचा कंटाळा असेल तर शाकाहारी पदार्थ खाऊ शकतो का? तर हो…

प्रथिनांसाठी अंड्यांना शाकाहारी पर्याय

टोफू, टेम्पेह, एडामामे यांसारखे सोया-आधारित पदार्थ हे प्रथिनांच्या बाबतीत अंड्यांच्या सर्वात जवळचे वनस्पती-आधारित पर्याय आहेत. जी मंडळी अंडी खात नाहीत. त्यांच्यासाठी प्रथिनांच्या बाबतीत अंड्यांच्या जवळपास जाणारे काही वनस्पती-आधारित पर्याय उपलब्ध आहेत.

केवळ अंड्याचा पांढरा भाग खाण्यापेक्षा संपूर्ण अंडे का खाल्ले पाहिजे?

अंडी एखाद्याच्या आहाराचा नियमित भाग बनली तरीही, बरेच लोक अजूनही अंड्याच्या पांढऱ्या भागालाच पसंती देतात. याचे मुख्य कारण म्हणजे अंड्याच्या पिवळ्या भागातील कोलेस्ट्रॉलची चिंता. अंड्याचा पिवळा भाग खाणे टाळण्याचा अनेकदा सल्ला दिला जातो. पण, वैद्यकीयदृष्ट्या ही कल्पना फारशी टिकत नाही. हृदयरोगतज्ज्ञ आणि फंक्शनल मेडिसिन तज्ज्ञ डॉक्टरर आलोक चोप्रा यांनी ७ फेब्रुवारी रोजी एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये याबद्दल माहिती दिली आहे की…

फक्त अंड्याचा पांढरा भाग (egg white) खाल्ल्यास काही लोकांच्या शरीरात सूज (inflammation) किंवा त्रास होऊ शकतो. कारण पांढऱ्या भागात प्रथिने (protein) असतात. पण, त्यात इतर पोषक घटक कमी असतात. अंड्याचा पिवळा भाग (yolk) मात्र खूप महत्त्वाचा असतो, त्यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि हेल्दी फॅट्स असतात. त्यामुळे संपूर्ण अंडे खाल्ल्यास शरीराला सर्व आवश्यक पोषक तत्व मिळतात. अंड्याच्या पांढऱ्या भागाच्या तुलनेत, पिवळ्या भागातून खूप जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड मिळतात. यामुळे पेशींची रचना, संप्रेरकांची निर्मिती, मेंदूचे कार्य आणि निरोगी रोगप्रतिकार प्रणालीसाठी आवश्यक आहे.