द कपिल शर्मा शोची प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहने अलीकडेच तिच्या परिवर्तनाने सर्वांना आश्चर्यचकित केले. इंटरमिटेंट फास्टिंग करून भारती सिंहने चक्क १५ किलो वजन कमी केले आहे. यावेळी भारतीने सांगितले की, इंटरमिटेंट फास्टिंगचा तिला खूप फायदा झाला आहे आणि आता तिचा दमा आणि मधुमेह देखील नियंत्रणात आलेला आहे. तसेच वजन कमी करण्यासाठी भारती सिंह ही संध्याकाळी ७ ते दुसऱ्या दिवशी १२ वाजेपर्यंत काहीही खात नाही.तर इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय? आणि कशा प्रकारे करतात जाणून घेऊयात.

इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय?

इंटमिटेंट फास्टिंग म्हणजे निरोगी जीवनशैलीसाठी दिवसाचे काही ठराविक तास उपाशी राहणं अथवा उपवास करणं. डाएटप्रमाणेच वजन कमी करण्यासाठी हा एक प्रभावी प्रकार सध्या प्रचलित होत आहे. यात दिवसाची काही ठराविक तास तुम्हाला चक्क कडक उपवास करावा लागतो. या फास्टिंगची वेळ तुम्ही तुमच्या सोयीनुसार ही वेळ ठरवू शकता. या प्रकारात तुम्ही काय खाता यापेक्षा कधी खाता याला जास्त महत्व आहे.

Indian advertising, Diversity,
भारतीय जाहिरातींतील विविधता हरवली! ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाचा अहवाल काय सांगतो…
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  
NPCIL Recruitment 2024
NPCIL Recruitment 2024: ट्रेड अप्रेंटिसच्या ३३५ जागांसाठी निघाली भरती, शेवटच्या तारखेपूर्वी करा अर्ज

इंटरमिटेंट फास्टिंग कशा प्रकारे करतात?

इंटरमिटेंट फास्टिंग करण्याचे अनेक प्रकार आहेत. बीबीसीच्या अहवालानुसार ज्यात १६/८ आणि ५/२ हे दोन प्रकार जास्त प्रचलित आहेत. १६/८ या प्रकारानुसार तुम्हाला दिवसभरात सोळा तास उपाशी राहावे लागते. यात जर तुम्ही सकाळी आठ वाजता नाश्ता केला तर त्यानंतर थेट सायंकाळी चार वाजता काहीतरी खाऊ शकता. त्यानंतर तुम्ही पुन्हा सकाळी आठ वाजता नाश्ता करू शकता.

दुसरीकडे, ५/२ या प्रकारात तुम्हाला आठवड्यातील पाच दिवस तुमच्या मनाप्रमाणे खाण्याची संमती असते. मात्र आठवड्याचे कोणतेही दोन दिवस तुम्ही ठराविक आहारच करू शकता. ठराविक कॅलरी मिळतील इतकाच आहार या दोन दिवसांमध्ये तुम्हाला करता येतो. आठवड्यातील हे दोन दिवस कोणते असतील हे तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे ठरवू शकता.

इंटरमिटेंट फास्टिंगमध्ये तुमचा आहार कसा असावा?

इंटरमिटेंट फास्टिंग करताना तुम्ही काय खात आहात याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तुमच्या आहारात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी ठेवा आणि पुरेसे प्रथिने मिळवा. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तुमच्या आहारात फायबरचे प्रमाण जास्त असले पाहिजे असे अन्न खा. यामुळे भूक लागत नाही आणि वजन कमी होते.

फास्टिंगच्या वेळी या गोष्टींचे सेवन करा

१६ तासांच्या फास्टिंग दरम्यान तुम्ही ग्रीन टी आणि भाज्यांचा ज्यूस घेऊ शकता. बऱ्याच वेळा असे घडते की फास्टिंगच्या वेळी तुम्ही चहा आणि कॉफीचे सतत सेवन करता. असे केल्याने इंटरमिटेंट फास्टिंगचा प्रभाव कमी होतो आणि वजन कमी होण्याऐवजी वाढते. खाण्याच्या ८ तासांच्या दरम्यान एकाच वेळी जास्त अन्न न घेण्याची तुम्ही काळजी घ्या. तसेच आहारात साखरे ऐवजी गुळाचा पर्याय म्हणून वापर करा.

इंटरमिटेंट फास्टिंग कुणी करू नये

इंटरमिटेंट फास्टिंग हा एक प्रकारचा कडक उपवासच आहे. त्यामुळे ज्यांचे वजन मुळातच खूप कमी आहे, लहान मुलं, वयात येणारे मुलंमुली, वृद्ध मंडळी, गरोदर आणि स्तनपान देणाऱ्या स्त्रीया,आजारी व्यक्ती, रक्तदाबाची समस्या असलेली माणसं यांनी हे मुळीच करू नये. कारण यामुळे त्यांच्या शरीरावर बराच काळ उपाशी राहील्यामुळे दुष्परिणाम होऊ शकतात. शिवाय इतर लोकांनाही सुरूवातीला कमी वेळासाठी इंटरमिटेंट फास्टिंगने सुरूवात करावी. सर्वात महत्वाचं म्हणजे इंटरमिटेंट फास्टिंग सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. ज्यामुळे तुमच्यासाठी हे योग्य आहे की नाही ते तुम्हाला नक्कीच समजू शकेल.