पेट्रोलपेक्षा विमानाचे इंधन खूप स्वस्त का आहे? जाणून घ्या हे जेट इंधन काय आहे?

दिल्लीमध्ये जेट इंधनाची किंमत प्रति किलोलिटर ७९,०२०.१६ रुपये प्रति किलोलीटर आहे.

lifestyle
कच्चे तेल शुद्ध करताना जेट इंधन आणि पेट्रोल वेगळे केले जातात. (photo: प्रतिनिधिक)

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किंमतींमुळे अनेक लोकं अस्वस्थ आहेत. दिल्लीमध्ये एक लिटर १०५.८४ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९४.५७ रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. तर मुंबईत पेट्रोलने १११ रुपये प्रति लीटरचा दर ओलांडला आहे.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तुमच्या स्वतःच्या देशात विमानांमध्ये भरलेल्या जेट इंधनाची किंमत खूप कमी आहे. दिल्लीमध्ये जेट इंधनाची किंमत प्रति किलोलिटर ७९,०२०.१६ रुपये प्रति किलोलीटर आहे. अशा प्रकारे प्रति लिटर किंमत ७९ रुपये झाली. देशात पेट्रोल यापेक्षा सुमारे ३३ टक्के अधिक महाग विकले जात आहे. आता सर्वात मोठा प्रश्न आहे, हे जेट इंधन म्हणजे काय? हे पेट्रोल आणि डिझेल व्यतिरिक्त वेगळ काही आहे का? या इंधनाची किंमत इतकी कमी का आहे?

जेट इंधन काय आहे?

वास्तविक जेट इंधन आणि गैसोलीन दोन्ही एकच गोष्टी आहेत. तांत्रिक भाषेत पेट्रोलला गैसोलीन म्हणतात. अमेरिका आणि युरोप या देशांमध्ये गैसोलीनला पेट्रोल म्हणून ओळखले जाते. पण जेट इंधनावर तुम्ही तुमची कार चालवू शकत नाही. जेट इंधन हे कच्च्या तेलाच्या सर्वात मूलभूत उपउत्पादनांपैकी एक आहे. हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काटेकोरपणे नियमन केले जाते.

जेट इंधनाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. जेट ए आणि जेट बी. त्यांच्या गुणवत्ता आणि अतिशीत बिंदूनुसार ते दोन प्रकारांमध्ये विभागले गेले आहेत. जेट बी इंधन प्रामुख्याने लष्करी कार्यात आणि अत्यंत खराब हवामान परिस्थितीत वापरले जाते. जेट बी इंधन जेट ए इंधनापेक्षा कमी शुद्ध आहे.

जेट इंधन कसे बनवले जाते?

कच्चे तेल शुद्ध करताना जेट इंधन आणि पेट्रोल वेगळे केले जातात. या दोघांमधील मूलभूत फरक त्यांच्यातील हायड्रोकार्बनच्या प्रमाणावर आधारित आहे. पेट्रोल असा हायड्रोकार्बन आहे ज्यात ७ ते ११ कार्बन अणू असतात, तर जेट इंधन हा असा हायड्रोकार्बन असतो ज्यात १२ ते १५ कार्बन अणू असतात. अधिक स्पष्टपणे सांगायचे तर, जेट इंधन मुख्यत्वे रॉकेलपासून बनवले जाते.

जेट इंधन पेट्रोलपेक्षा स्वस्त का आहे?

खरं तर देशातील पेट्रोलियम उत्पादनांवर लावण्यात येणाऱ्या कर व्यतिरिक्त, त्यांना शुद्ध करण्याचा खर्च देखील ग्राहकांकडून आकारला जातो. कच्चे तेल पेट्रोल, डिझेल, जेट इंधन, रॉकेल आणि एलपीजी सारख्या सर्व उप-उत्पादने बनवण्यासाठी शुद्ध केले जाते. शुद्धीकरणाच्या या प्रक्रियेत जेट इंधन बनवण्याचा खर्च कमी होतो. जेट इंधन हे शुद्ध केलेले इंधन नाही. तर पेट्रोल हे अत्यंत साफ शुद्ध इंधन आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: What is jet fuel jet fuel vs petrol why aviation fuel is cheaper than petrol gasoline and petrol are same scsm

ताज्या बातम्या