scorecardresearch

जाणून घ्या, काय आहे Monkey Fever ? ‘ही’ आहेत या आजाराची लक्षणे

केरळमध्ये ‘मंकी फिवर’ या नव्या आजाराने डोकं वर काढलं आहे. मंकी फिवरला क्यासनूर फॉरेस्ट डिसीज (Kyasanur Forest disease) असे म्हटले जाते.

monkey fever
आरोग्य कर्मचाऱ्यांनुसार अद्याप या आजाराने ग्रस्त असलेला एकच रुग्ण आढळला आहे. (प्रातिनिधिक फोटो : AP)

आपल्या देशावरून करोना विषाणूचे संकट अद्याप मिटलेले नाही. अशातच केरळमध्ये ‘मंकी फिवर’ या नव्या आजाराने डोकं वर काढलं आहे. यामुळे देशामध्ये पुन्हा एकदा चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. केरळमधील वायनाड जिल्ह्यातील २४ वर्षीय तरुण या आजाराने ग्रस्त होता. आरोग्य कर्मचाऱ्यांनुसार अद्याप या आजाराने ग्रस्त असलेला एकच रुग्ण आढळला आहे. मंकी फिवरला क्यासनूर फॉरेस्ट डिसीज (Kyasanur Forest disease) असे म्हटले जाते.

जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. सकिना यांनी सांगितले की, आरोग्य अधिकार्‍यांनी या तापाबाबत आधीच अलर्ट जारी केला होता आणि स्थानिक लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. या आजाराने ग्रस्त तरुणाला मानंतवाडी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. तसेच, त्यांची प्रकृती स्थिर असून मंकी फिवरचा आणखी एकही रुग्ण आढळलेली नसल्याचे डॉ. सकीना यांनी सांगितले.

Video : दुर्मिळ आजाराशी लढा देत, वयाच्या १४व्या वर्षी समुद्रावर राज्य करणारी भारताची जलपरी; गोष्ट अ’सामान्यांची – भाग १६

रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांनुसार, क्यासनूर फॉरेस्ट डिसीज व्हायरस (KFDV) ची ओळख १९५७ साली झाली. कर्नाटकच्या क्यासनूर जंगलात एका आजारी माकडामध्ये हा विषाणू आढळून आला. त्याकाळी दरवर्षी सुमारे चारशे ते पाचशे रुग्णांना या विषाणूची लागण होत असे. या विषाणूचा एकदा संसर्ग झाल्यानंतर तो आयुष्यभर राहतो. हे संक्रमित प्राण्याच्या संपर्कात आल्याने किंवा टिक कीटक चावल्यामुळे होऊ शकते.

काय आहेत मंकी फिवरची लक्षणे ?

सीडीसीनुसार,

  • ३ ते ८ दिवसांच्या इनक्यूबेशन कालावधीनंतर केडीएफची लक्षणे म्हणजेच थंडी वाजणे, ताप आणि डोकेदुखी अचानकपणे सुरु होते.
  • सुरुवातीच्या लक्षणांनंतर ३ ते ४ दिवसांपर्यंत स्नायूंच्या तीव्र वेदनांसह उलट्या, ओटीपोटात दुखणे आणि रक्तस्त्रावाच्या समस्या उद्भवू शकतात.
  • याशिवाय, रुग्णांना असामान्यपणे कमी रक्तदाब, कमी प्लेटलेट्सचा सामना करावा लागू शकतो.

मेसेजला लगेच रिप्लाय मिळाला नाही तर तुमचीही चिडचिड होते? जाणून घ्या यामागचं कारण

लक्षणे दिसू लागल्याच्या १ ते २ आठवड्यानंतर रुग्ण बरे होतात. तथापि, हा आजार काही रुग्णांमध्ये दोन चरणांमध्ये येतो. तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला दुसरा टप्पा सुरु होऊ शकतो. या दरम्यान, लक्षणांमध्ये ताप, तीव्र डोकेदुखी, मानसिक समस्या, कणकण आणि दिसण्यात अडथळा यासारख्या गोष्टींचा समावेश असू शकतो. सीडीसीनुसार, केएफडीमध्ये मृत्यू दर ३ ते ५ टक्के आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-02-2022 at 17:09 IST

संबंधित बातम्या