उच्च रक्तदाब हा एक जुनाट आजार आहे जो केवळ हृदयावर ताण देत नाही तर हृदयविकाराचा धोका देखील वाढवतो. तुमच्या रक्तदाबात दिवसभर चढ-उतार होत असतात. सामान्य व्यक्तीचा रक्तदाब १२०/८० मिमी एचजी किंवा त्याहून कमी असतो. यापेक्षा जास्त रक्तदाब हे उच्च रक्तदाबाचे लक्षण आहे. मेयो क्लिनिकच्या मते, उच्च रक्तदाब १२० ते १२९ सिस्टोलिक दाब आणि ८० पेक्षा कमी डायस्टोलिक दाब म्हणून परिभाषित केला जातो.

१२०/८० mm Hg पेक्षा जास्त रक्तदाब हा उच्च रक्तदाब मानला जातो. उच्च रक्तदाबासाठी चुकीचा आहार, बिघडलेली जीवनशैली आणि ताणतणाव जबाबदार आहेत. आहारातील पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे रक्तदाबाच्या पातळीवर परिणाम होतो. आहारात पोटॅशियमची कमतरता असली तरी रक्तदाबाची पातळी झपाट्याने वाढू लागते.

priya bapat reacts on not having baby
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”
high-bp
Blood Pressure Range: जाणून घ्या, वयानुसार महिला आणि पुरुषांचा रक्तदाब किती असावा ?
what is normal blood sugar level
तुमच्या वयानुसार तुमची Blood Sugar किती हवी? जाणून घ्या ‘हा’ सोपा तक्ता
SaReGaMaPa Little Champs Winner singer Kartiki Gaikwad home photos
लवकरच आई होणाऱ्या कार्तिकी गायकवाडचं घर आहे खूपच सुंदर, पाहा फोटो

पोटॅशियमच्या कमतरतेमध्ये बद्धकोष्ठता, धडधडणे, थकवा, स्नायूंचे नुकसान, स्नायू कमकुवत किंवा पेटके आणि सुन्नपणा यांचा समावेश असू शकतो. पोटॅशियम युक्त पदार्थांचे सेवन उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी असल्याचे सिद्ध होते. आहारातील काही पदार्थांचे सेवन केल्यास रक्तदाब सहज नियंत्रित करता येतो. जाणून घेऊया वयानुसार सामान्य व्यक्तीचा रक्तदाब कसा असावा, चार्ट पाहा?

( हे ही वाचा: ‘या’ आजारांमुळे वाढतो किडनी निकामी होण्याचा धोका; डॉक्टरांकडून जाणून घ्या किडनीची योग्य काळजी कशी घ्यावी)

वयानुसार रक्तदाब (सिस्टोलिक आणि डायस्टोलिक) चार्ट

Age Minimum (Systolic/Diastolic)Normal (Systolic/Diastolic)
६ ते १३ वर्षे९०/६० १०५/७०
१४ ते १९ वर्षे१०५/७३ ११७/७७
२० ते २४ वर्षे१०८/७५ १२०/७९
२५ ते २९ वर्षे १०९/७६ १२१/८०

पोटॅशियम सेवन केल्याने रक्तदाब कसा नियंत्रित होतो?

पोटॅशियम युक्त अन्नाचे सेवन रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी असल्याचे सिद्ध होते. पोटॅशियमयुक्त पदार्थ हृदय निरोगी ठेवतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवतात. पोटॅशियम आरोग्य राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. पोटॅशियम हे एक आवश्यक खनिज आहे जे आपल्या पेशींमध्ये द्रवपदार्थाची सामान्य पातळी राखण्यास मदत करते.

हेल्थ हार्वर्डच्या मते, ते हृदयाचे ठोके नियंत्रित करते, स्नायू आणि मज्जातंतूंचे योग्य कार्य सुनिश्चित करते आणि प्रथिने संश्लेषित करण्यासाठी आणि कार्बोहायड्रेट्सचे चयापचय करण्यासाठी महत्वाचे आहे. याशिवाय हे खनिज रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. पोटॅशियम रक्तवाहिन्यांच्या भिंती शिथिल करते, आणि रक्तदाब कमी करते..

( हे ही वाचा: कोणतीही औषधे न घेता वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल होईल झपाट्याने कमी? डॉक्टरांनी दिलेला ‘हा’ सल्ला एकदा वाचाच)

कोणते पदार्थ खाऊन रक्तदाब नियंत्रित करता येतो?

काही पदार्थांमध्ये पोटॅशियम भरपूर असते जसे की पालेभाज्या, बीन्स, नट, दुग्धजन्य पदार्थ, मासे जसे की ट्यूना, कॉड, ट्राउट आणि पिष्टमय भाज्या. त्यात पोटॅशियम भरपूर असते जे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आहे. याशिवाय केळी, संत्री, खरबूज, मध, जर्दाळू आणि द्राक्षे या फळांमध्येही पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी प्रभावी आहे. किडनी बीन्स, मसूर, सोयाबीनसह बीन्स आणि शेंगा देखील रक्तदाब नियंत्रित करतात.