Sundar Pichai morning routine : जागतिक स्तरावरील नेते मध्यमवर्गीय लोकांच्या विचारांवर मोठा प्रभाव टाकतात. विशेषतः शिस्त, काम करण्याची पद्धत आणि दैनंदिन सवयींबाबत. अनेक तरुण व्यावसायिक मोठ्या कंपन्यांचे मालक किंवा यशस्वी लोक रोज कोणत्या सवयी पाळतात, याबद्दल जाणून घेण्यास खूप उत्सुक असतात. त्यांच्या दिनचर्येचे त्यांना फक्त आकर्षणच वाटत नाही, तर त्या दिनचर्येची स्वतःच्या आयुष्यातही अंमलबजावणी करून पाहावी, अशी इच्छा अनेकांच्या मनात निर्माण होते.

अशीच अनेकांसाठी आदर्श असलेली एक व्यक्ती म्हणजे गूगलचे सीईओ सुंदर पिचाई. शांत नेतृत्वशैली आणि स्पष्ट विचारसरणी यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सुंदर पिचाई यांची दैनंदिन दिनचर्या आश्चर्यकारकपणे अगदी साधी आहे. ते सकाळी ६.३० ते ७ च्या दरम्यान उठतात आणि आपल्या दिवसाची सुरुवात निवांतपणे करण्यास पसंती देतात.

‘On with Kara Swisher’ या कार्यक्रमात कारा स्विशर यांच्याशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, त्यांना सकाळी मोबाईल स्क्रोल करीत बसण्याऐवजी हातात वर्तमानपत्र घेऊन वाचायला आवडते. ही दिवसाची एक शांत सुरुवात असते.

सुंदर पिचाई ज्यांच्यावर अवलंबून असतात, असे नाश्त्याचे ३ पदार्थ खालीलप्रमाणे…

सुंदर पिचाई यांचा नाश्ता साधा आणि दररोज तोच असतो. त्यामध्ये चहा, ऑम्लेट, टोस्ट यांचा समावेश असतो. सुंदर पिचाई भारतात लहानाचे मोठे झाले. त्यामुळे त्यांच्यासाठी सकाळचा चहा खूप महत्वाचा असतो. जरी तो थोडा इंग्लिश पद्धतीचा असला तरीही… सुंदर पिचाई शाकाहारी आहेत. त्यामुळे शरीराला प्रथिने मिळवण्यासाठी नाश्त्याला टोस्टबरोबर ऑम्लेट सुद्धा खातात.

नाश्त्याला चहा, ऑम्लेट, टोस्ट खाण्याचे फायदे…

चहा

चहा हा अनेक भारतीय घरांमध्ये दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. तो पाण्यात चहाची पाने टाकून, एकत्र उकळून बनवला जातो. त्यानंतर त्यात दूध, साखर, वेलची किंवा काळी मिरी यांसारखे मसाले घातले जातात. गाळण्यापूर्वी काही मिनिटे ते व्यवस्थित मुरू दिले जाते. ही एक अत्यंत साधी प्रक्रिया असली तरी ती आपल्या दैनंदिन संस्कृतीशी खोलवर रुजलेली आहे. जरी दुधाचा चहा सर्वांत जास्त प्रचलित असला तरी अनेक जण वेगवेगळ्या पानांपासून किंवा औषधी वनस्पतींपासून बनवलेले हलके (लाइट) चहा प्रकारही आवडीने पिणे पसंत करतात.

ऑम्लेट

अंडी प्रथिनांचा एक उत्तम स्रोत म्हणून ओळखली जातात, ज्यामुळे नाश्त्यासाठी हा एक सोईस्कर पर्याय ठरतो. अंडी फेटून आणि अनेकदा त्यात इतर घटक घालून, तव्यावर शिजवून ऑम्लेट बनवले जाते. साधारणपणे अंडी थोडे मीठ व मिरपूड घालून फेटली जातात आणि नंतर ते मिश्रण तव्यावर ओतले जाते. ते घट्ट होऊ लागल्यावर त्यात कांदे, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, चीज किंवा हर्ब्ससारखे पदार्थ घालता येतात. ऑम्लेट भाजल्यावर ते दुमडून वाढले जाते. ऑम्लेट साधे किंवा अगदी मसाला, चीज किंवा भाज्या घालून अशा अनेक प्रकारे तयार केले जाते. ऑलिव्ह किंवा लेट्यूससारखे अतिरिक्त घटक घालूनसुद्धा तुम्ही ऑम्लेट बनवू शकता, ज्यामुळे पोटसुद्धा भरते आणि आवडसुद्धा पूर्ण होते.

टोस्ट

टोस्ट हा नाश्त्यातील सर्वांत सोप्या पदार्थांपैकी एक आहे. टोस्टर, पॅन किंवा अगदी गॅसच्या आगीवर ब्रेड धरून, तो सोनेरी होईपर्यंत भाजून खाल्ला जातो. त्यासाठी व्हाईट, ब्राऊन, मल्टीग्रेन यांसारख्या विविध प्रकारच्या ब्रेडचा वापर केला जाऊ शकतो. हे तुकडे कुरकुरीत व सोनेरी होईपर्यंत गरम केले जातात आणि बटर, जॅम, चीज किंवा अगदी अ‍ॅव्होकॅडो या पदार्थांबरोबरही खाऊ शकता.

ही सवय खूप साधी आहे. त्,यात काहीही जास्त किंवा अवघड नाही. फक्त जे उपयोगी आहे तेच खाल्ले जाते. कठीण गोष्टी करण्यापेक्षा रोज साधे आणि नियमितपणे नाश्त्याचे सेवन करणे जास्त महत्त्वाचे असते.