Republic Day 2023: 26 जानेवारी (Republic Day of India) आपण दरवर्षी अगदी उत्साहात साजरा करतो. यंदाचा प्रजासत्ताक दिन अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सगळीकडे हा दिवस साजरा करण्याची लगभग देखील सुरु झाली आहे. यंदा आपला देश ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. आपण हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करत असलो तरी अनेकांना एक प्रश्न नेहमी पडत असतो, तो म्हणजे २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट म्हणजेच प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनामध्ये नेमका फरक काय? या दोन दिवसांमध्ये फरक आहेच शिवाच हे दोन्ही दिवस साजरे करण्याचे पद्धतदेखील वेगवेगळी आहे. कदाचित त्याबद्दल अनेकांना माहिती नसते. आज आम्ही तुम्हाला या दोन्ही गोष्टींबाबतची माहिती देणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- विश्लेषण: प्रजासत्ताक दिनाचा चित्ररथ नेमकं कोण घडवतं? महाराष्ट्राची यंदाची थीम नेमकी काय असणार?

स्वातंत्र्यदिन –

आपण दरवर्षी १५ ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करत असतो. नुकताच आपल्या देशाने स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा केला. त्यासाठी संपुर्ण देशभरात तिरंगा लावण्यात आला होता. घरांपासून ते सोशल मीडिया तिरंगामय झाला होता. कारण प्रत्येकाने आपल्या सोशल मीडियावरील खात्यांचे डीपी बदलवून राष्ट्रध्वजाचा फोटो ठेवावा, असे आवाहन खुद्द देशाच्या पंतप्रधानांनी केले होते. १५ ऑगस्टला स्वातंत्र्यादिन आपण दरवर्षी साजरा करतो, कारण या दिवशी ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीपासून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले होते, त्याचा उत्सव म्हणून १५ ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करत असतो.

हेही वाचा- Republic Day 2023 : जाणून घ्या प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व आणि इतिहास

प्रजासत्ताक दिन –

२६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन हा दिवस आपण आपल्या देशात भारतीय संविधान लागू झाले म्हणून साजरा करतो. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आली त्याची आठवण म्हणून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. खरतंर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान सभेने संविधान स्वीकारले आणि २६ जानेवारी १९५० पासून ते अंमलात आणले. तर २६ जानेवारी ही प्रजासत्ताक दिनाची तारीख म्हणून निवडण्यात आली याच्या मागेही एक महत्वपुर्ण असं कारण सांगितलं जातं, ते म्हणजे याच दिवशी म्हणजे २६ जानेवारी १९३० मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारतीय स्वातंत्र्याची घोषणा केली होती. म्हणून संविधान अंमलात आणल्याची तारीख आणि भारतीय स्वातंत्र्याची घोषणा या दोन्हीचा संदर्भ या तारखेला आहे.

हेही वाचा- पोस्टमार्टम फक्त दिवसा केलं जातं रात्री का नाही? यामागील सत्य जाणून तुम्हीही थक्क व्हाल

स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या पद्धती –

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी दोन्ही दिवशी झेंडा फडकवण्याची पद्धत, जागा यामध्ये फरक आहेत. ते पुढीलप्रमाणे

  • १५ ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्यदिनाला पंतप्रधान झेंडा फडकवतात.
  • २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाला राष्ट्रपती ध्वजारोहण करतात. कारण देश १५ ऑगस्टला स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रपती पद अस्तित्वातच नव्हतं.
  • स्वातंत्र्यदिनाला तिरंगा उघडलेल्या अवस्थेत दोरीने वर चढवला जातो त्याला ध्वजारोहण म्हणतात. तर २६ जानेवारीला तिरंग्याची बंद घडी करून दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेला जातो नंतर फक्त फक्त दोरी ओढून झेंडा फडकवण्यात येतो. ज्याला ध्वज फडकावणे म्हणतात.
  • १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांचा झेंडा खाली उतरला आणि भारताचा झेंडा वर चढला. म्हणून त्याला ध्वजारोहण म्हणतात. तर २६ जानेवारी १९५० रोजी भारताचा झेंडा होताच पण स्वातंत्र्यानंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्षे ब्रिटीशांच्या कायद्यानेच राज्य चालले म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेला जातो आणि नंतर तो फडकवला जातो.
  • १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होते.
  • २६ जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर झेंडा फडकवला जातो.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the difference between 15th august and 26th january know why the tricolor is hoisted at different times on both days jap
First published on: 22-01-2023 at 10:41 IST